Delta Plus व्हेरिएंटविरूद्ध कोरोना लस किती प्रभावी, लस नव्या व्हेरिएंटशी लढू शकते?
Delta Plus व्हेरिएंट

Delta Plus व्हेरिएंटविरूद्ध कोरोना लस किती प्रभावी, लस नव्या व्हेरिएंटशी लढू शकते?

Delta Plus Variant and Vaccine: डेल्टा प्लस व्हेरिएंटविरुद्ध कोरोना प्रतिबंधक लस कितपत प्रभावी आहे याबाबत आता काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. जाणून घ्या याविषयी सविस्तरपणे.

मुंबई: ICMR चे वैज्ञानिक कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या नवीन म्युटेशन डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या (Delta Plus Variant) अधिक माहिती एकत्रित करीत आहेत. एनआयव्ही पुणेमध्ये आयसीएमआर हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहे की, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन (Covaxin) लस नवीन स्ट्रेनला निष्क्रिय करु शकतो का.

याबाबत सूत्रांनी असं निदर्शनास आणून दिले आहे की, कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांच्या सीरमचे नमुने घेण्यात आले आहेत. ज्याचा वापर हे तपासण्यासाठी होणार आहे की, नव्या व्हेरिएंटला निष्क्रिय करण्यासाठी अँटीबॉडीज किती प्रभावी आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या प्रतिनिधीचं असं म्हणणं आहे की, ही लस डेल्टा व्हेरिएंटच्याविरूद्ध काम करते आहे. आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लस डेल्टा व्हेरिएंटच्या विरोधात प्रभावी आहेत.

Delta Plus व्हेरिएंट
Delta Plus: लस आणि प्रतिकारशक्ती या दोन्हीला चकमा देऊ शकतो कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट: तज्ज्ञ

काल (मंगळवार) झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान ते म्हणाले की, डेल्टा व्हायरसवर वेगवेगळ्या लसींचा काय प्रभाव होतो याची माहिती उपलब्ध असून ती लवकरच उपलब्ध करुन दिली जाईल. त्याच वेळी, आरोग्य तज्ज्ञ आणि विषाणूशास्त्रज्ञांनी असे निदर्शनास आणून दिले आहे की, डेल्टा प्लस व्हेरिएंट मात्र लस आणि संसर्ग प्रतिकारशक्ती या दोन्ही गोष्टींना चकवू शकतं.

तज्ज्ञांच्या मते, कोरोनाविरूद्ध उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या मोनोक्लोनल अँटीबॉडी ट्रीटमेंट डेल्टा प्लस व्हेरियंट विरूद्ध काम करू शकत नाही.

मॅक्स हेल्थकेअरचे इंटर्नल मेडिसिनचे संचालक रोमेल टिक्कू म्हणाले की, उपलब्ध आकडेवारी पाहिल्यास असे दिसते आहे की, डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या विरूद्ध मोनोक्लोनल अँटीबॉडी टिट्रमेंट प्रभावी होणार नाही. पण, हा दावा अधिक बळकट करण्यासाठी आम्हाला अधिकचा डेटा आवश्यक आहे.

आरोग्य तज्ज्ञ आणि अमेरिकन शास्त्रज्ञ एरिक फीगल-डिंग यांनी ट्विट करुन असं म्हटलं आहे की, अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस डेल्टा व्हेरिएंटपर्यंत प्रभावित आणि मर्यादित आहे. अ‍ॅस्ट्रॅजेनेका लस ही डेल्टा व्हेरिएंटच्या विरूद्ध 60 टक्के प्रभावी आहे. तर फायझर 88 टक्के प्रभावी आहे. हे चाचणी नसलेल्या एका अभ्यासामध्ये समोर आले आहे.

Delta Plus व्हेरिएंट
समजून घ्या : Delta+ Variant नेमका आहे तरी काय? महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे सर्वाधिक रुग्ण कोणत्या जिल्ह्यात?

लसच्या एका डोसचा सरासरी परिणाम हा 33 टक्के आहे आणि बर्‍याच देशांमध्ये फक्त एक डोस दिला गेला आहे. WHO च्या डॉक्टर मारिया वान केरखोव या असं म्हणतात की, डेल्टा व्हेरिएंट हा आमच्यासाठी खूपच चिंतेचा विषय आहे. कारण तो जगभरात पसरतो आहे. दरम्यान, जगातील 92 देशात डेल्टा व्हेरिएंट आहे. ज्यापैकी 80 देशात B1.617.2 व्हेरिएंट आहे तर उर्वरित 12 देशात B.167 व्हेरिएंट आहे.

भारतात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटचे एकूण 30 रुग्ण आढळून आले आहेत. ज्यापैकी 21 रुग्ण हे महाराष्ट्रात सापडले आहेत. तर कर्नाटकात 2, केरळमध्ये 2 आणि मध्य प्रदेशात 5 रुग्ण आढळून आले आहेत.

भारतीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी डेल्टा प्लसला 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न' करण्याचा प्रकार जाहीर केला आहे आणि राज्यांना टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in