'अहमदाबाद पोलीस कमिशनर बोल रहा हूँ'...सुताराचा एक फोन आणि कृष्णप्रकाश यांच्या टीमला हजारोंचा गंडा

फसवणूक झाल्याचं लक्षात येताच सूत्र हलली आणि भामटा ताब्यात
'अहमदाबाद पोलीस कमिशनर बोल रहा हूँ'...सुताराचा एक फोन आणि कृष्णप्रकाश यांच्या टीमला हजारोंचा गंडा

- समीर शेख, पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश हे आपल्या धडाकेबाज कारवाईसाठी ओळखले जातात. गुन्हेगारांच्या मनात पोलिसांविषयी जरब तयार करण्यात कृष्णप्रकाश यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. काही दिवसांपूर्वी एका हत्या प्रकरणातील तीन आरोपींना पकडण्यातही कृष्णप्रकाश स्वतः सहभागी झाले होते. परंतू कृष्णप्रकाश यांच्या टीमला मुंबईतल्या एका सुताराने गंडवून २४ हजार रुपयांना गंडवलं आहे.

जाणून घ्या नेमकं घडलं तरी काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ८ डिसेंबरला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कंट्रोल रुममध्ये एका व्यक्तीने फोन करुन मी अहमदाबाचा पोलीस आयुक्त विजय सिंग बोलत असल्याचं सांगितलं. पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या गुन्ह्यांविषयी माझ्याकडे माहिती आहे, ती माहिती मला तुमच्या आयुक्तांना द्यायची आहे असं सांगत या व्यक्तीने कंट्रोल रुममधील कर्मचाऱ्यांकडून कृष्णप्रकाश यांचा नंबर मिळवला. यावेळी कर्मचाऱ्यांनीही या व्यक्तीवर विश्वास ठेवत कृष्णप्रकाश यांचा नंबर त्या व्यक्तीला दिला.

यानंतर या व्यक्तीने कृष्णप्रकाश यांना फोन करण्याचा प्रयत्न केला, परंतू कृष्णप्रकाश यांनी फोन न उचलल्यामुळे त्याने पुन्हा एकदा कंट्रोल रुमला फोन लावला. तुमचे आयुक्त फोन उचलत नाहीत असं सांगत तुमच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर द्या असं सांगत या व्यक्तीने अन्य वरिष्ठांचे नंबर मिळवले.

'अहमदाबाद पोलीस कमिशनर बोल रहा हूँ'...सुताराचा एक फोन आणि कृष्णप्रकाश यांच्या टीमला हजारोंचा गंडा
योगेश जगताप हत्या : तिन्ही आरोपी अटकेत, आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हजरजबाबीपणामुळे आरोपी जाळ्यात

पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हे घडणार असल्याची बतावणी -

या व्यक्तीने नंतर इतर बड्या पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधत, तुमच्या शहरात घडणाऱ्या गुन्ह्यांविषयी माहिती माझ्याकडे आहे. ही माहिती देणाऱ्या खबऱ्याला तुम्हाला त्यासाठी आर्थिक मदत करावी लागेल असं सांगत या व्यक्तीने पोलीस अधिकाऱ्यांना G-Pay अकाऊंटचा नंबर दिला. यावेळीही पोलीसांना या व्यक्तीवर विश्वास बसला, त्यामुळेच त्यांनी विविध नंबरवरुन या व्यक्तीने दिलेल्या अकाऊंटवर २४ हजार रुपये पाठवले.

पैसे मिळाले फोन स्विचऑफ, आपल्याला फसवलं गेल्याचं पोलिसांना समजलं -

पैसे ट्रान्स्फर झाल्यानंतर या व्यक्तीने आपला फोन स्विचऑफ केला. वारंवार संपर्क साधल्यानंतरही फोन बंद लागत असल्यामुळे पोलिसांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्र हलवत मोबाईल टॉवर लोकेशन आणि तांत्रिक सहाय्याने या व्यक्तीला जेरबंद केलं.

आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश
आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश

मुंबईच्या जोगेश्वरी भागात सुताराचं काम करतो आरोपी -

अधिक तपास केला असता फोनवरुन आपण अहमदाबाद पोलीस आयुक्त बोलत असल्याची बतावणी करणारा व्यक्ती हा मुंबईच्या जोगेश्वरी भागात सुताराचं काम करत असल्याचं समोर आलं. खलीलउल्ला खान असं या आरोपीचं नाव असून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. व्यवसायाने सुतार असलेल्या खलीलउल्लाला अलिशान जीवन जगण्याची आणि लेडीज बारमध्ये पैसे उडवण्याची सवय आहे. यासाठीच त्याने हा प्रकार केल्याचं कबूल केलं. याव्यतिरीक्त राज्यात अन्य जिल्ह्यांमध्ये पोलिसांशी संपर्क साधून खलीलउल्लाने अशीच फसवणूक केल्याचं समोर आलंय.

'अहमदाबाद पोलीस कमिशनर बोल रहा हूँ'...सुताराचा एक फोन आणि कृष्णप्रकाश यांच्या टीमला हजारोंचा गंडा
पुणे : लाखोंची फसवणूक, तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार; 'ते' व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

काही दिवसांपूर्वीच कृष्णप्रकाश यांच्या पथकावर आरोपीने केलेल्या गोळीबारामुळे चांगलीच चर्चा रंगली होती. परंतू यानंतर एका सुताराने पोलिसांना घातलेल्या या गंड्याची सध्या शहरात चर्चा सुरु आहे.

'अहमदाबाद पोलीस कमिशनर बोल रहा हूँ'...सुताराचा एक फोन आणि कृष्णप्रकाश यांच्या टीमला हजारोंचा गंडा
आजार बरा करण्यासाठी महिलेकडे शारिरिक संबंधाची मागणी, गुप्तांगाचे फोटो पाठवणारा भोंदूबाबा अटकेत

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in