ICICI बँकेच्या माजी CEO Chanda Kochhar आणि पतीला CBI कडून अटक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

CBI has arrested former ceo icici bank chanda kochhar : नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) कर्ज फसवणूक प्रकरणी सीबीआयने् (CBI) चंदा कोचर*(Chanda Kochar) आणि त्यांचे पती दीपक कोचर (Deepak Kochar) यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. गेली अनेक वर्ष कर्ज फसवणूक प्रकरणी चंदा कोचर यांची चौकशी सुरु होती. अखेर आज (23 डिसेंबर) सीबीआयने त्यांना अटक करुन मोठा दणका दिला आहे. (cbi has arrested former ceo icici bank chanda kochhar and her husband deepak kochhar)

मार्च 2018 मध्ये चंदा कोचर यांच्यावर तिच्या पतीला आर्थिक लाभ देण्यासाठी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ICICI बँकेने व्हिडीओकॉन समूहाला 3,250 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. व्हिडीओकॉन समूहाने या कर्जातील 86 टक्के (सुमारे 2810 कोटी रुपये) परतफेड केलीच नाही. त्यामुळे 2017 मध्ये हे कर्ज NPA (Non Performing Assets) मध्ये टाकण्यात आले.

आधार नंबरवरून तुमचा बँक अकाउंट हॅक होऊ शकतो का? सेफ्टीसाठी करा हे काम

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

चंदा कोचर यांनी 1984 मध्ये ICICI बँकेत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून प्रवेश केला होता. 1994 मध्ये जेव्हा ICICI संपूर्ण मालकीची बँकिंग कंपनी बनली तेव्हा चंदा कोचर यांना सहाय्यक महाव्यवस्थापक बनवण्यात आलं होतं. यानंतर चंदा कोचर याच बँकेत यशाच्या एक-एक पायऱ्या चढत राहिल्या. उपमहाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक या पदांद्वारे बँकेने त्यांना 2001 मध्ये थेट कार्यकारी संचालक बनवले. यानंतर त्यांच्याकडे कॉर्पोरेट व्यवसाय पाहण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर तिला मुख्य आर्थिक अधिकारी बनवण्यात आले.

2009 मध्ये चंदा कोचर यांना सीईओ (CEO) आणि एमडी (MD) बनवण्यात आले. चंदा कोचर यांच्या नेतृत्वाखाली आयसीआयसीआय बँकेने रिटेल व्यवसायात पाऊल ठेवले, ज्यामध्ये यांना प्रचंड यश मिळाले. दरम्यान, भारत सरकारने चंदा कोचर यांना तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान (2011 साली) पद्मभूषण देऊन सन्मानितही केलं होतं.

ADVERTISEMENT

मुंबै बँक प्रकरण : विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांना अटकेपासून तात्पुरता दिलासा

ADVERTISEMENT

दरम्यान, कोचर यांच्या पतीच्या कंपनीतील गुंतवणुकीबाबत बँकेच्या कर्जदार कंपनी व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजने केलेल्या अयोग्यतेच्या आरोपानंतर चंदा कोचर यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

वास्तविक, व्हिडीओकॉन समूहाचे अध्यक्ष वेणुगोपाल धूत यांचे कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्याशी व्यावसायिक संबंध आहेत. व्हिडीओकॉन ग्रुपच्या मदतीने स्थापन केलेल्या कंपनी नंतर चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या नेतृत्वाखाली पिनॅकल एनर्जी ट्रस्टच्या नावे करण्यात आली होती. दीपक कोचर यांच्या सह-मालकीच्या या कंपनीमार्फत धूत यांनी कर्जाचा मोठा भाग मिळवला. त्यांच्यावर असा आरोप आहे की, 94.99% होल्डिंग असलेले हे शेअर्स केवळ 9 लाख रुपयांना हस्तांतरित करण्यात आले.

बँकेने सुरुवातीला कोचर यांच्याविरोधातील प्रकरण घाईघाईने दाबण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर जनतेच्या आणि नियामकांच्या सततच्या दबावामुळे बँकेला संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश द्यावे लागले. बँकेने 30 मे 2018 रोजी जाहीर केले की बोर्ड व्हिसल ब्लोअरच्या आरोपांची तपशीलवार तपासणी करेल. त्यानंतर या प्रकरणाच्या स्वतंत्र तपासाची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बीएन श्रीकृष्ण यांच्यावर सोपवण्यात आली.

जानेवारी 2019 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाचा तपास पूर्ण झाला आणि चंदा कोचर दोषी आढळल्या. 2020 च्या सुरुवातीस, ED ने चंदा कोचर, दीपक कोचर आणि त्यांच्या मालकीच्या आणि नियंत्रित कंपन्यांची 78 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. आता CBI ने त्यांना अटक केल्याने मोठा फटका बसला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT