IAF Helicopter मधल्या 14 पैकी 13 जणांचा मृत्यू, बिपिन रावत यांच्या प्रकृतीबाबत अद्याप माहिती नाही

CDS Bipin Rawat Chopper Crash Updates; 13 out of 14 died
CDS Bipin Rawat Chopper Crash Updates; 13 out of 14 died

तामिळनाडूतल्या कुन्नूरमध्ये भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये CDS बिपिन रावत आणि त्यांची पत्नीही होती. तसंच लष्करी अधिकारीही होते. एकूण 14 जण या हेलिकॉप्टरमध्ये होते. त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र बिपिन रावत यांच्या प्रकृतीबाबत काही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

CDS Bipin Rawat Chopper Crash Updates; 13 out of 14 died
CDS Bipin Rawat : देशाचे पहिले CDS बिपिन रावत यांच्याबाबत माहिती आहे का?

तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये ही दुर्घटना घडली. तामिळनाडूतन गेल्या काही दिवसांपासून प्रचंड पाऊस सुरू आहे. त्यामुळे खराब वातावरणामुळे ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे. या हेलिकॉप्टरमधून बिपीन रावत आणि त्यांची पत्नीही प्रवास करत होती.

कोण आहेत बिपीन रावत?

डिसेंबर 2019 मध्ये बिपीन रावत सेनादलातून निवृत्त होणार होते. ते निवृत्त होण्यापूर्वी नरेंद्र मोदी सरकारनं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती करुन त्यांना त्यापदावर काम करण्यासाठी संधी दिली होती. 16 मार्च 1958मध्ये बिपीन रावत यांचा जन्म झाला. त्यांचे वडील एलएस रावत सैन्यात होते. लेफ्टनंट जनरल एलएस रावत म्हणून त्यांची ख्याती होती. बिपीन रावत यांचं बालपण सैनिकांच्या सहवासातच गेलं. शिमल्याच्या सेंट एवडर्ड स्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यांचा परफॉर्मन्स पाहून त्यांना SWORD OF HONOUR ने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेतलं. तिथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजातून पदवीचं शिक्षण घेतलं. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही पूर्ण केला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in