Helicopter Crash: CDS बिपीन रावत यांचा अपघाती मृत्यू; हेलिकॉप्टर दुर्घटनेत रावत यांच्या पत्नीसह 13 जण ठार

CDS Bipin Rawat and 13 persons died: तामिळनाडूत झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
cds bipin rawat madhulika rawat and 11 other persons on board have died in the unfortunate helicopter accident
cds bipin rawat madhulika rawat and 11 other persons on board have died in the unfortunate helicopter accident(फाइल फोटो- सीडीएस जनरल बिपीन रावत)

नवी दिल्ली: तामिळनाडूमधील कुन्नूरमध्ये बुधवार (8 डिसेंबर) झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातबाबत आता अत्यंत मोठी आणि संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी बातमी समोर आली आहे. भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS)बिपीन रावत (Bipin Rawat)यांचं निधन झालं आहे. याबाबतची अधिकृत माहिती भारतीय हवाई दलाच्या (Indian air Force) ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे. बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत आणि इतर 11 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या अपघातात एकूण 13 जणांचा मृत्यू झाला असल्याचं अधिकृतरित्या समोर आलं आहे. दरम्यान, या वृत्तामुळे अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे.

जेव्हा हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला त्यावेळी सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि लष्कराचे इतर उच्चपदस्थ अधिकारी देखील होते. या विशेष हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. ज्यापैकी 13 जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन संपूर्ण परिस्थिती जाणून घेतली. ज्यानंतर राजनाथ सिंह यांनी लष्कर आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांशी बराच वेळ चर्चा केली. अखेर या सगळ्या चर्चेनंतर हवाई दलाने बिपीन रावत यांच्या निधनाबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

या अपघातानंतर बुधवारी संध्याकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा संबंधी समिती (CCS) बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे उपस्थित होते. आता या बैठकीत नेमकं काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये भारतीय हेलिकॉप्टर क्रॅश झालं होतं. ज्यामध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिक रावत यांच्यासह 13 जणांचा अपघाती मृत्यू झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, या बिपीन रावत यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून बिपीन रावत आणि 14 जणांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सहा वर्षापूर्वीही बिपीन रावत बचावले होते हेलिकॉप्टर दुर्घटनेतून

जनरल बिपीन रावत हे साधारण 6 वर्षापूर्वी एका हेलिकॉप्टर दुर्घटनेतून अगदी थोडक्यात बचावले होते. बिपीन रावत हे 3 फेब्रुवारी 2015 साली नागालँडच्या दीमापूरमध्ये झालेल्या अपघातग्रस्त चीता हेलिकॉप्टरमध्ये होते. त्यावेळी ते लष्कर लेफ्टनंट जनरल पदावर होते.

नेमकी घटना काय?

एका लेक्चर सीरीजसाठी सीडीएस बिपीन रावत हे उटीमधील वेलिंग्टन या लष्करी कॉलेजमध्ये गेले होते. यावेळी त्यांच्या पत्नी आणि ब्रिगेडिअर रँकचे अधिकारी देखील सोबत होते. सीडीएस रावत हे सुलूरहून कुन्नूरला हेलिकॉप्टरने परत येत होते. इथून ते पुन्हा विशेष विमानाने दिल्लीला परतणार होते.

मात्र, कुन्नूर येथेच त्यांच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. संपूर्ण जंगली भाग असलेल्या हे हेलिकॉप्टर प्रचंड वेगाने खाली कोसळलं. ज्यामुळे ते आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलं. ज्यामुळे या हेलिकॉप्टरमधील पायलटसह 13 जणांचा मृत्यू झाला.

cds bipin rawat madhulika rawat and 11 other persons on board have died in the unfortunate helicopter accident
Bipin Rawat: 'जळत्या हेलिकॉप्टरमधून 3 जणांनी उडी घेतली', प्रत्यक्षदर्शीने सांगितलेली नेमकी घटना जशीच्या तशी

बिपीन रावत यांचा थोडक्यात परिचय?

16 मार्च 1958मध्ये बिपीन रावत यांचा जन्म झाला. त्यांचे वडील एलएस रावत सैन्यात होते. लेफ्टनंट जनरल एलएस रावत म्हणून त्यांची ख्याती होती. बिपीन रावत यांचं बालपण सैनिकांच्या सहवासातच गेलं. शिमल्याच्या सेंट एवडर्ड स्कूलमधून त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं. त्यांचा परफॉर्मन्स पाहून त्यांना SWORD OF HONOUR ने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेतलं. तिथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजातून पदवीचं शिक्षण घेतलं. सोबतच त्यांनी हायकमांडचा कोर्सही पूर्ण केला.

डिसेंबर 2019 मध्ये बिपीन रावत सेनादलातून निवृत्त होणार होते. ते निवृत्त होण्यापूर्वी नरेंद्र मोदी सरकारनं चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदाची निर्मिती करुन त्यांना त्यापदावर काम करण्यासाठी संधी दिली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in