CDS बिपीन रावत यांच्यासह 14 जणांचा मृत्यूचं नेमकं कारण काय? चौकशी अहवालात समोर आलं कारण

CDS Bipin Rawat Chopper Crash Updates;
CDS Bipin Rawat Chopper Crash Updates;

तामिळनाडू येथील कुन्नूर या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या 14 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. देशाला सून्न करणारी ही घटना होती. हा अपघात कसा झाला? या सगळ्यांच्या मृत्यूचं कारण काय? याबाबत चर्चा झाली. आता यासंदर्भातला अहवाल समोर आल्याने अपघाताचं कारण समोर आलं आहे.

8 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या अपघातावरील प्राथमिक अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या चौकशीत तपास पथकाने हेलिकॉप्टरचा फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरचाही अभ्यास केला. याशिवाय सर्व साक्षीदारांचे जबाबही घेण्यात आले. यातून या अपघाचे कारण काय असू शकते याचा अंदाज घेण्यात आला. चौकशीत अपघातामागे मेकॅनिकल फेल्युअर म्हणजेच यांत्रिक बिघाड, घातपात किंवा दुर्लक्ष अशी कारणं नसल्याचं म्हणत त्या शक्यता फेटाळल्या आहेत.

cds bipin rawat madhulika rawat and 14 other persons on board have died in the unfortunate helicopter accident
cds bipin rawat madhulika rawat and 14 other persons on board have died in the unfortunate helicopter accident(फाइल फोटो- सीडीएस जनरल बिपीन रावत)

अहवालात हेलिकॉप्टरच्या अपघाताला अचानक बदललेलं हवामान आणि त्यानंतर हेलिकॉप्टरचा ढगांमध्ये प्रवेश हे कारण असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. कोर्ट ऑफ इंक्वायरीने चौकशी अहवालातील माहितीच्या आधारे काही शिफारसी देखील केल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूच्या कोइम्बतूर आणि सुलूरदरम्यानच्या कुन्नूर या ठिकाणी हा अपघात झाला. इथल्या निलगिरीच्या डोंगळाळ प्रदेशामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळलं. यावेळी हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण प्रवास करत होते. यात लष्कराच्या काही वरीष्ठ अधिकाऱ्यांचा देखील समावेश होता.

तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत हे या हेलिकॉप्टरमध्ये होते. मात्र, या अपघातात रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला होता. यात रावत यांच्या पत्नीचाही समावेश होता. अपघातात एक अधिकारी वाचले. मात्र, ते गंभीर जखमी असल्यानं नंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. अशाप्रकारे या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व 14 जणांचा मृत्यू झाला होता.

CDS Bipin Rawat Chopper Crash Updates;
CDS Bipin Rawat: दिल्लीहून उड्डाण ते हेलिकॉप्टर क्रॅश... जाणून घ्या शेवटच्या तासाभरात काय घडलं!

CDS बिपिन रावत यांचं आयुष्य भारतीय लष्कराची सेवा करण्यातच गेलं. उंचीवर जाऊन युद्ध करण्याच्या म्हणजेच हाय माऊंटन वॉरफेअरमध्ये त्यांचा हातखंडा होता. एवढंच नाही तर सर्जिकल स्ट्राईकही त्यांच्या नेतृत्त्वातच केला गेला होता. बिपिन रावत यांचा जन्म उत्तराखंड या ठिकाणी गढवाली राजपूत कुटुंबात झाला. बिपिन रावत यांनी 1978 मध्ये लष्करात प्रवेश केला. 2011 मध्ये त्यांनी चौधरी चरणसिंह विद्यापीठातून मिलिट्री मीडिया स्टडीज मध्ये पीएचडीही केली.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपिन रावत यांना उंच पर्वतरांगाममध्ये युद्ध करण्याचा चांगला अनुभव होता. त्यामध्ये त्यांचं विशेष कौशल्यही होतं. 2016 मध्ये उरीच्या लष्करी तळावर जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर लष्कर प्रमुख या पदावर कार्यरत असलेल्या रावत यांनी 29 सप्टेंबर 2016 ला पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पॅरा कमांडोजच्या सहाय्याने बिपिन रावत यांनी ही मोहीम फत्ते करून दाखवली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in