Bipin Rawat यांच्या नेतृत्वात करण्यात आला होता सर्जिकल स्ट्राईक, जाणून घ्या बिपिन रावत यांच्याबद्दल..

बिपिन रावत यांचं हेलिकॉप्टर अपघाताच निधन
Bipin Rawat यांच्या नेतृत्वात करण्यात आला होता सर्जिकल स्ट्राईक, जाणून घ्या बिपिन रावत यांच्याबद्दल..

CDS बिपिन रावत यांचा आज हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. आज दुपारी 12 च्या सुमारास लष्कराच्या IAF हेलिकॉप्टरचा अपघात झाला. कुन्नूरमध्ये ही घटना घडली. तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला असून ते पूर्णपणे जळून राख झालं. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत यांच्यासह 14 जण होते. धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने हा अपघात झाला. या घटनेत बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

CDS बिपिन रावत यांचं आयुष्य भारतीय लष्कराची सेवा करण्यातच गेलं. उंचीवर जाऊन युद्ध करण्याच्या म्हणजेच हाय माऊंटन वॉरफेअरमध्ये त्यांचा हातखंडा होता. एवढंच नाही तर सर्जिकल स्ट्राईकही त्यांच्या नेतृत्त्वातच केला गेला होता. बिपिन रावत यांचा जन्म उत्तराखंड या ठिकाणी गढवाली राजपूत कुटुंबात झाला. बिपिन रावत यांनी 1978 मध्ये लष्करात प्रवेश केला. 2011 मध्ये त्यांनी चौधरी चरणसिंह विद्यापीठातून मिलिट्री मीडिया स्टडीज मध्ये पीएचडीही केली.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपिन रावत यांना उंच पर्वतरांगाममध्ये युद्ध करण्याचा चांगला अनुभव होता. त्यामध्ये त्यांचं विशेष कौशल्यही होतं. 2016 मध्ये उरीच्या लष्करी तळावर जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर लष्कर प्रमुख या पदावर कार्यरत असलेल्या रावत यांनी 29 सप्टेंबर 2016 ला पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्यांचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. पॅरा कमांडोजच्या सहाय्याने बिपिन रावत यांनी ही मोहीम फत्ते करून दाखवली होती.

बिपिन रावत यांना मिलिट्री अॅकेडमीमध्ये स्वोर्ड ऑफ ऑनर देऊन गौरवण्यात आलं होतं. रावत यांनी चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. तसंच भारतीय लष्कराचे 27 वे प्रमुख म्हणूनही काम पाहिलं आहे.

Bipin Rawat यांच्या नेतृत्वात करण्यात आला होता सर्जिकल स्ट्राईक, जाणून घ्या बिपिन रावत यांच्याबद्दल..
CDS Bipin Rawat: उंच पर्वतरागांमधील लढाईचे तज्ज्ञ आहेत बिपीन रावत! जाणून घ्या त्यांची 10 वैशिष्ट्ये

उरीमध्ये झालेल्या घटनेला उत्तर देण्यासाठी हा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. त्यामध्ये बिपिन रावत यांचा सिंहाचा वाटा होता. बिपिन रावत यांनी आपल्या लष्करी सेवेदरम्यान एलओसी, चीन सीमा आणि नॉर्थ ईस्ट भागात दीर्घकाळ वास्तव्य केलं होतं. बिपिन रावत यांनी काश्मीर खोऱ्यात नॅशनल रायफल्समध्ये ब्रिगेडियर आणि त्यानंतर मेजर जनरल पदापर्यंत पोहचत इंफेंट्री डिव्हिजनची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. साऊथ कमांड सांभाळल्यानंतर पाकिस्तान पश्चिमेला असलेल्या सीमेवर मॅकेनाईझ्ड वॉरफेअरसोबतच एअर फोर्स आणि नेव्ही यांच्यासोबतही योग्य समन्वय प्रस्थापित केला. चीनच्या सीमेवर बिपिन रावत यांनी कर्नल म्हणून इंफेंट्री बटालियनची जबाबदारी सांभाळली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in