Crime: अश्लील फोटो काढून मुलींना करायचा ब्लॅकमेल, पीडित तरुणींनी 'असा' काढला काटा

Murder Case: अश्लील फोटो काढून तरुणींना ब्लॅकमेल करणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणांची 10वी शिकणाऱ्या दोन तरुणांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Crime: अश्लील फोटो काढून मुलींना करायचा ब्लॅकमेल, पीडित तरुणींनी 'असा' काढला काटा
chennai girls kill 20th year blackmailer two students arrest crime instagram(मृत प्रेमकुमार)

चेन्नई: चेन्नईमध्ये तरुणींनी इंस्टाग्राम (Instagram)मित्रांकडून ब्लॅकमेल करणाऱ्या एका तरुणाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ब्लॅकमेलरची हत्या करणारी दोन्ही मुले दहावीचे विद्यार्थी आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेमकुमार या 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर रेड हिल्सजवळ एका टोळक्याने अचानक हल्ला केला होता. प्रेमकुमारवर हल्ला झाल्याचे पाहून त्याच्या मित्राने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर त्यांनी त्याच्या पालकांना याबाबत माहिती दिली. या हल्ल्यात प्रेमकुमार याचा मृत्यू झाला आहे. यानंतर प्रेमकुमारच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा या हत्याकांडामागील आरोपींची जी माहिती मिळाली त्यामुळे पोलिसांनाही धक्का बसला. कारण हत्या करणारे दोन्ही आरोपी हे दहावीचे विद्यार्थी होते. दोघांनी नोंदवलेल्या जबाबानुसार, प्रेमकुमारने अनेक मुलींशी मैत्री केली होती आणि कथितरित्या त्याने अनेक जणींचे अश्लील फोटो देखील काढले होते. यानंतर तो या फोटोंचा वापर करून मुलींना ब्लॅकमेल करत होता.

दुसरीकडे काही पीडित मुलींचे म्हणणे आहे की, त्यांनी प्रेमकुमारला सुमारे दीड लाख रुपये दिले होते. मात्र तरीही तो त्यांना वारंवार ब्लॅकमेल करत होता. या सगळ्या प्रकाराला वैतागून मुलींनी या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावण्याचं ठरवलं.

ज्यानंतर मुलींनी दुसर्‍या मुलांची मदत घेतली. ज्याच्याशी त्यांची इंस्टाग्रामद्वारे मैत्री झाली होती. मग पीडित मुली आणि त्यांच्या दोन मित्रांनी एक प्लॅन बनवला.

जर प्रेमकुमारने पैसे मागितले त्याला रेड हिल्समधील निर्जन ठिकाणी येण्यास सांगायचं असं या मुलांनी पीडित मुलींना सांगितलं. झालंही असंच.. प्रेमकुमार याने पैशाची मागणी केल्यानंतर मुलींनी त्याला रेडहिल्स येथे येण्यास सांगितलं.

त्यानुसार प्रेमकुमार हा रेडहिल्स येथे पोहचला. तो तिथे पोहचताच एका टोळक्याने त्याला घेरले आणि काही समजण्यापूर्वीच त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याच्यासोबत गेलेल्या त्याच्या मित्राने पळून जाऊन त्याच्या पालकांना याबाबतची माहिती दिली.

chennai girls kill 20th year blackmailer two students arrest crime instagram
Mumbai: 25 वर्षीय तरुणासोबत विवाहित महिलेचे अनैतिक संबंध, तरुणाने अश्लील Video पाठवला थेट पतीला

दरम्यान, या टोळीने प्रेमकुमारची हत्या केली आणि त्याला तिथेच एका मोकळ्या जागेत गाडून टाकलं. अखेर पोलिसांनी पीडित मुलींमार्फत गुन्हेगारांचा माग काढला आणि त्यांना घटनास्थळी नेले.

त्यानंतर पोलिसांनी पुन्हा जमीन खोदून प्रेमकुमारचा मृतदेह ताब्यात घेतला. आता त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. तसेच या हत्येत सहभागी असणाऱ्या इतरही जणाचा पोलीस सध्या शोध घेत आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in