Chhagan Bhujbal: 'वेळ पडल्यास वाघ पंजाही मारतो', भुजबळांनी का केलं असं वक्तव्य

Chhagan Bhujbal On Shiv Sena-BJP: शिवसेना-भाजप एकत्र येणार का? याबाबत चर्चा सुरु असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे.
छगन भुजबळ
छगन भुजबळ

प्रविण ठाकरे

नाशिक: भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात सुरु असलेल्या वाकयुद्धात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि अन्न वितरण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उडी घेतली आहे. 'मैत्री कोणाशी करायचे हे वाघाच्या मनावर अवलंबून असते, तसेच वेळ पडल्यास वाघ पंजाही मारु शकतो.' असा टोला छगन भुजबळ यांनी भाजपला लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भाजपला इशारा दिला आहे. छगन भुजबळ यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वैयक्तिक भेटीवर प्रश्न करण्यात आला होता. तसेच शिवसेना मवाळ भूमिका घेत असल्याचे विचरले असता भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'राज्याचे अनेक प्रश्न केंद्राशी संबंधित आहेत. यामुळे जमवून घ्यावे लागते. परंतु मैत्री करायची की नाही हे वाघाच्या मनावर आहे. वेळ पडल्यास वाघ पंजा मारू शकतो.' असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.

छगन भुजबळ
BJP-Shiv Sena: 'वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार', भाजपची शिवसेनेला थेट ऑफर

नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत काय म्हणाले भुजबळ?

दरम्यान, याचवेळी नवी मुंबई विमानतळाच्या नावावरुन सध्या जो संघर्ष सुरु आहे त्याबाबतही छगन भुजबळ यांना विचारण्यात आलं. ज्यावर भुजबळ म्हणाले. 'आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी नवी मुंबई विमानतळाला स्वतःचे नाव नाकारले असते.'

दरम्याना, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दिल्लीत झालेल्या भेटीनंतर महाराष्ट्रात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य देखील केली जात आहे. अशावेळी आता छगन भुजबळांनी देखील एक नवं वक्तव्य करुन या विषयाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न केला आहे.

छगन भुजबळ
Shivsena-BJP: वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची-संजय राऊत

'वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची'

'वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची.' असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना काल (10 जून) प्रत्युत्तर दिलं होतं.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला तर वाघाशी मैत्री करायला आम्ही तयार आहोत.' असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. याबाबत खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं. संजय राऊत पक्षबांधणीच्या निमित्ताने पाच दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विषयावर भाष्य केलं.

'चंद्रकांत पाटील गोड माणूस आहे, त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत.' अशा शुभेच्छाही संजय राऊत यांनी दिल्या होत्या.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in