Pune: ‘सौ दर्द छुपे है सिने मैं मगर..’, छगन भुजबळांचा शेर, अनेकांच्या भुवया उंचावल्या!

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: ‘सौ दर्द छुपे है सिने मैं… मगर अलग मजा है जिने मैं’, अशी शेरोशायरी राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केल्याने सर्वांच्याच भुवया आता उंचावल्या आहेत. महात्मा फुले समता परिषदेचा समता पुरस्कार प्रदान समारोहासाठी पुण्यातील समता भूमी, फुले वाडा येथे अन्न नागरी पुरवठा मंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगन भुजबळ हे हजर होते.

भुजबळांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार रविवारी (28 नोव्हेंबर) सोहळा पडला. ज्यासाठी छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित होते. यावेळी बोलताना भुजबळांनी तुफान फटकेबाजी केली. यावेळी भुजबळांनी आपल्या खास शैलीत विरोधकांवर देखील निशाणा साधला.

दरम्यान, याच कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळांनी बरीच शेरोशायरी केली. मात्र त्यांच्या एका शेरमुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाहा छगन भुजबळ नेमकं काय-काय म्हणाले:

छगन भुजबळांचा ‘शेर’ आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या..

ADVERTISEMENT

‘सौ दर्द छुपे है सिने मैं… मगर अलग मजा है जिने मैं’, असा शेर छगन भुजबळ यांनी म्हटल्यानंतर आता राजकीय वर्तुळात याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राज्यात फडणवीस सरकार सत्तेत असताना छगन भुजबळ यांना अटक झाली होती. याच अटकेच्या आधाही भुजबळ हे सोशल मीडियावर शेरो-शायरीच्या माध्यमातून व्यक्त होते. तसंच आपल्या हितशत्रूंना काही सूचक इशारे देखील देत होते.

ADVERTISEMENT

असं असताना आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीने भुजबळांनी शेर म्हटलाने.. भुजबळांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय? असा सवाल अनेक जण उपस्थित करत आहेत.

‘तुमचा भुजबळ करू’ असं आता म्हणता येणार नाही, छगन भुजबळ यांचा भाजपला टोला

‘त्यांना वाटतं हे घाबरतील आणि इकडून तिकडे जातील…’

‘अजूनही माझ्या मागे अनेक गोष्टी चालूच आहेत. मला अडचणीत आणण्यासाठी एका मागोमाग बरंच काही केलं जात आहे. त्यांना वाटतंय हे घाबरतील आणि इकडून तिकडे जातील. पण असं काही होणार नाही. नहीं बदलते हम ओरो की हिसाब से… एक लिबास हमे भी दिया हे खुदा ने अपने हिसाब से.’ असं म्हणत छगन भुजबळ यांनी विरोधकांना जोरदार टोला हाणला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT