उत्तराखंडमध्ये चिनी सैनिकांनी केली होती घुसखोरी, पुलाचंही केलं नुकसान? - Mumbai Tak - chinese soldiers transgressed in uttarakhand barahoti last month on horses and destroyed infrastructure says report - MumbaiTAK
बातम्या

उत्तराखंडमध्ये चिनी सैनिकांनी केली होती घुसखोरी, पुलाचंही केलं नुकसान?

लडाखच्या पूर्व भागात ताणाताणी झाल्यानंतर आता चीनने उत्तराखंडमध्ये नापाक कारवाई केली. एका वृत्त संस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार चिनी लष्कराचे 100 हून अधिक जवान सीमा ओलांडून भारतात घुसले. हे सैनिक उत्तराखंडच्या बाराहोती भागात गेले होते. रिपोर्टनुसार ही घटना 30 ऑगस्टची आहे. या घुसखोरीनंतर काही तासांनी उत्तराखंडच्या बाराहोती भागातून चिनी सैनिक परतले होते. तुन जुनला पास ओलांडून चीनचे […]

लडाखच्या पूर्व भागात ताणाताणी झाल्यानंतर आता चीनने उत्तराखंडमध्ये नापाक कारवाई केली. एका वृत्त संस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार चिनी लष्कराचे 100 हून अधिक जवान सीमा ओलांडून भारतात घुसले. हे सैनिक उत्तराखंडच्या बाराहोती भागात गेले होते. रिपोर्टनुसार ही घटना 30 ऑगस्टची आहे.

या घुसखोरीनंतर काही तासांनी उत्तराखंडच्या बाराहोती भागातून चिनी सैनिक परतले होते. तुन जुनला पास ओलांडून चीनचे 100 पेक्षा जास्त सैनिक हे भारतात घुसले होते. पाच किमीपर्यंत आत येत त्यांनी ही घुसखोरी केली होती. अशीही माहिीत मिळाली आहे की एका पुलाचंही या सैनिकांनी नुकसान केलं. याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली आहे.

काय आहे राहुल गांधी यांचं ट्विट?

जुमला-घर में घुस के मारेंगे

सच-चीन हमारे देश में घुस के मार रहा है

असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं.

100 पेक्षा जास्त सैनिकांनी घुसखोरी केल्याचं वृत्त सुरक्षा यंत्रणांनी नाकारलं आहे. या संबंधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चिनी सैनिकांनी एक पूल पाडल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र बाराहोती भागात असा कुठला पूलच नाही. आणखी एक माहिती अशी समोर आली आहे की बाराहोती भागात एक गुरांना चरण्यासाठी सोडलं जातं ते मैदान आहे. 60 स्क्वेअर किमी भागात है मैदान पसरलं आहे या मैदानातून दोन्ही देशांमधले गुराखी, मेंढपाळ येत जात असतात. या ठिकाणी लष्कराकडून फारशी पेट्रोलिंग केली जात नाही. बाराहोती भागात स्थानिक प्रशासकीय पथकं वेळोवेळी पाहणी करत असतात. बाराहोती मध्ये गेल्या काही दशकांपासून एक पद्धत आहे ती म्हणजे दोन्ही देशांकडून कोणतंही लष्कर या भागात येणार नाही.

या भागात भारत तिबेट सीमा पोलीस दलाचे जवान तैनात आहेत. भारतीय सैनिकांना सूचना मिळाल्यानंतर या ठिकाणी गस्त वाढवण्यात आली होती. रिपोर्टसमध्ये दिलेल्या माहितीनुसार दोन्ही देशांच्या सीमांवरून या ठिकाणी अस्पष्टता आहे त्यामुळे उल्लंघन केल्याच्या घटना घडत आहेत. 30 ऑगस्टला भारतीय अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सीमेवर चिनी सैनिक आल्याचं पाहिलं होतं. याआधी 2018 मध्येही अशी एक घटना घडली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

four × 1 =

‘या’ गोष्टी नियमित फॉलो केल्यात तर Weight Loss ची 100% गॅरंटी! अभिनेत्रीचा कमाल Fitness, घेते खास डाएट प्लान! Water Fastion पद्धतीने खरंच चुटकीसरशी होईल Weight Loss? Places to visit: भारतातच पण कमी बजेटमध्ये ‘या’ सुंदर ठिकाणांना नक्की भेट द्या! PM Modi कोणता फोन वापरतात? फोटो Viral रणदीप हुडाने मैतेई धार्मिक पद्धतीने का केलं लग्न? सांगितली फॅमिली प्लानिंग BB17: 19 वर्षीय अभिनेत्रीचे लाईव्ह ब्रेकअप, दुसरे नातेही तोडले Fitness पाहून वयाचा अंदाज लावणं कठीण; सुपरस्टार्स आहेत तरी किती वर्षांचे? Beauty Tips: चाळीशीत दिसा अगदी टीप-टॉप! फक्त ‘या’ गोष्टी करा फॉलो! महाराष्ट्राचे मिनी काश्मीर, पाचगणी-महाबळेश्वर हरवले धुक्यात …म्हणून परिणीतीने ॲनिमल सोडला Liplock नंतर रणबीर-रश्मिकाचा बेडरुम सीन व्हायरल, इंटिमेट सीनचा कहर ‘कपिल शर्मा शो’मध्ये ‘हा’ कलाकार घेतो सर्वाधिक मानधन? …तर आयुष्यभर कोलेस्ट्रॉल कमी नाही होणार सिगारेट सोडल्यानंतर शरीरामध्ये होतात ‘हे’ बदल दुधात साखर मिसळून पिता, तर आजच करा बंद …म्हणून हिवाळ्यात आलं खाणं ठरतं फायद्याचं Weight Loss: घरच्या घरी ‘हे’ 7 बेस्ट कार्डिओ वर्कआउट करा! नितळ अन् कोमल त्वचा हवीये? फॉलो करा हा ‘k’ फॉर्म्युला! दररोज ‘ही’ 5 छोटी कामं करून Belly Fat सहज करा कमी!