COVID Free Booster Dose : १८ वर्षांवरच्या नागरिकांना ७५ दिवस मोफत डोस, मोदी सरकारचा मोठा निर्णय

वाचा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
Citizens above 18 years will get COVID 'booster dose' free from July 15, big announcement from Central Government
Citizens above 18 years will get COVID 'booster dose' free from July 15, big announcement from Central GovernmentIndia Today

१८ वर्षांवरील नागरिकांना पुढच्या ७५ दिवसांसाठी कोरोना लसीचा मोफत डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी ही महत्त्वाची घोषणा केली. १५ जुलै पासून पुढच्या ७५ दिवसांसाठी १८ वर्षांवरच्या नागरिकांना बूस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

भारत हा सध्या ७५ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे. त्यामुळे देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येतो आहे. १५ जुलै २०२२ पासून पुढील ७५ दिवस १८ वर्षांवरच्या नागरिकांना कोरोना लसीचा मोफत बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला गेला आहे असं अनुराग ठाकूर यांनी जाहीर केलं.

बूस्टर डोस कुणासाठी?

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले लोक त्यांना जर सहा महिने झाले असतील तर ते हा बूस्टर डोस घेऊ शकतात.

बूस्टर डोस म्हणून कोणती लस दिली जाणार?

तुम्हाला आधी ज्या दोन लसींचे डोस देण्यात आले आहेत. त्याच लसीचा बूस्टर डोस देण्यात येईल.

बूस्टर डोससाठी नोंदणी कशी कराल?

बूस्टर डोससाठी तुम्हाला आधीचे दोन डोस झाले आहेत आणि त्याला सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ झाला आहे तर तुम्हाला हा डोस घेता येईल. त्यासाठी वेगळी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in