महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात सरन्यायाधीश ट्रोल, खासदारांची थेट राष्ट्रपतींकडे तक्रार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Chief Justice of India dy chandrachud trolled : सर्वोच्च न्यायालयात गुरूवारी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी पार पडली. आता या प्रकरणातील निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. या निकालाकाकडे महाराष्ट्रासह राजकिय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एकिकडे सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सूरू असताना, दुसरीकडे सोशल मीडियावर घटनापीठ आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (dy chandrachud) यांच्याविरोधात ट्रोल आर्मी सक्रिय झाली होती. ही ट्रोल आर्मी (Troll Army) त्यांना ट्रोल करते. या प्रकरणी आता विरोधी खासदारांनी (Opposition mp) राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांना लेखी तक्रार देऊन कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणात राष्ट्रपती काय कारवाई करतात, हे पाहावे लागणार आहे. (cji dhananjay chandrachud trol bye troling army opposition mp written complaint to president droupadi murmu)

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वात 5 सदस्यीय घटनापीठासमोर गेल्या 9 महिन्यापासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान घटनापीठ आणि सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (dy chandrachud) यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत होते. या ट्रोलिंग विरोधात देशातील विरोधी खासदार आक्रमक झाले असून त्यांनी राष्ट्रपतींना लेखी तक्रार दिली आहे.

विधानसभेत ठिणगी : आशिष शेलार-भास्कर जाधवांमध्ये शाब्दिक चकमक, नार्वेकर म्हणाले…

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

लेखी तक्रारीत काय?

सिनीयर अॅडव्होकेट विवेक जानखा यांच्या लेटरहेडवरून विरोधी खासदारांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु (Droupadi Murmu) यांना लेखी तक्रार दिली आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाशी (भाजप-शिवसेना शिंदे गट) हितसंबंध आणि सहानूभूती असलेल्या ट्रोल आर्मीने सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याविरोधात सोशल मीडियावर ट्रोल आर्मीद्वारे बदनामी सुरू केली आहे, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. यासह सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करून त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. त्यामुळे हा प्रकार घाणेरडा आणि निंदनीय असल्याचे खासदारांनी पत्रात म्हटलेय.

Ramesh Patil: “आमच्याकडे गुजरातची वॉशिंग पावडर”, भाजप आमदारांचं विधान

ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी करणाऱ्या भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना ट्रोल करणाऱ्या आर्मीला आणि या आर्मीला सपोर्ट आणि स्पान्सर करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी या पत्राद्वारे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान या लेखी तक्रारीवर अनेक खासदारांनी सह्या केल्या आहेत. यामध्ये ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, खासदार जया बच्चन, खा. राघव चढ्ढा यासह अनेक खासदारांचा समावेश होता.आता या प्रकरणात राष्ट्रपती काय कारवाई करतात हे पाहावे लागणार आहे.

शिंदे-ठाकरेंची धडधड वाढली… सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT