औरंगाबाद, उस्मानाबादनंतर आणखी एका शहराचं नामांतर?; एकनाथ शिंदेंनी दिले संकेत

धनगर मेळावा आणि सन्मान सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर शहराच्या नामांतराबद्दल मांडली सरकारची भूमिका
maharashtra cm eknath shinde on Rename of Ahmednagar
maharashtra cm eknath shinde on Rename of Ahmednagar

मराठवाड्यातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांच्या नामांतराला अलिकडेच राज्य सरकारने परवानगी दिली. त्यामुळे नामांतराचा मुद्दा बाजूला पडला होता. मात्र, औरंगाबाद आणि उस्मानाबाद पाठोपाठ अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर केलं जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे संकेत दिले आहेत.

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत धनगर मेळावा आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरबद्दल सरकारची भूमिका स्पष्ट केली.

maharashtra cm eknath shinde on Rename of Ahmednagar
महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला? संजय राऊत यांच्या प्रश्नाला उद्धव ठाकरे काय उत्तर देणार?

सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'धनगर समाजाला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असला तरी राज्य शासन या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन,' असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्याबाई होळकरांचं नाव

'धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सर्व सोई-सुविधा दिल्या जातील. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल. विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातील. अहिल्याबाई होळकर यांचे भव्य स्मारक व्हावे ही माझीही इच्छा आहे. राज्यात त्यांचे भव्य दिव्य स्मारक उभारले जाईल. अहमदनगरला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याची बाब तपासून कार्यवाही करण्यात येईल," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

ओबीसी आरक्षण : आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार -एकनाथ शिंदे

'आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेतले जातील. धनगर वाड्या वस्त्यांमध्ये सोईसुविधा दिल्या जातील. तसेच आत्मदहन करणाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये देऊ व त्यांना नोकरी देण्याबाबतही निर्णय घेतला जाईल. हे सरकार समाजातील सर्व घटकांचे सरकार आहे. धनगर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल,' असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.

maharashtra cm eknath shinde on Rename of Ahmednagar
औरंगाबादचं संभाजीनगर व्हायला अजून किती काळ लागेल?, काय आहे पुढची प्रक्रिया?

अहमदनगरला कोणतं नाव देण्याची मागणी झालीये?

औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सातत्याने चर्चिला गेला. याच मुद्द्यानंतर अहमदनगर शहराच्या नावाचीही मागणी केली गेली. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात असलेल्या चौंडी हे अहिल्याबाई होळकरांचं जन्म ठिकाण आहे. त्यामुळ अहिल्याबाई होळकर यांच्या यांच्या नावावरून नाव देण्याची मागणी केली जातेय.

खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगरचे नामांतर अंबिकानगर करण्याची मागणी काही वर्षापूर्वी केली होती. हीच भूमिका मनसेनंही घेतलेली आहे. तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर शहराचं नामांतर अहिल्यानगर करण्याची मागणी केलेली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in