पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांची पाठ फिरायचा अवकाश! काही सेकंदात १०० किलो पेढे गायब, व्हीडिओ व्हायरल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैठणचा दौरा केला. पैठणमध्ये त्यांनी संदीपान भुमरेंसाठी मेळावा घेतला. त्या मेळाव्यात केलेलं भाषणही चर्चेत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप विरोधक करत आहेत. अशात पैठणमधला एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पाठ फिरताच १०० किलो पेढे काही सेकंदात गायब झाल्याचं दिसतंय

काय आहे पेढे गायब होण्याचं प्रकरण?

पैठणमध्ये जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहचले तेव्हा त्यांची लाडू आणि पेढ्यांनी तुला करायची असं काही कार्यकर्त्यांनी ठरवलं होतं. त्यासाठीची सगळी तयारीही केली होती. अगदी ती तुलाही फुलांनी सजवली होती. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र तुला करण्यास नकार दिला. त्यानंतर मुख्यमंत्री हे तिथून गेले. मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच अवघ्या काही सेकंदात १०० किलो लाडू आणि पेढे गायब झाले. लोकांनी ते इतक्या वेगाने पळवले. या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.

‘रोखठोक’मधील टीका एकनाथ शिंदेंच्या जिव्हारी?; उद्धव ठाकरेंना दिली दोन आव्हानं

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. पैठणमध्ये त्यांनी सभा घेतली. या सभेला चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र आता सोशल मीडियावर हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हायरल व्हीडिओत?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठ फिरताच तिथे अनेक लोक तराजूपाशी गेले आणि ते सगळेजण शक्य होईल तेवढे लाडू आणि पेढ्यांचे पुडे पळवून नेताना या व्हीडिओत दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला. १०० किलो लाडू आणि १०० किलो पेढे या ठिकाणी आणले होते असं कळतंय अशात हे सगळे पेढे आणि लाडू या ठिकाणाहून अवघ्या काही सेकंदात गायब झाले.

ADVERTISEMENT

ठाकरे गटातल्या कार्यकर्त्यांनी हा व्हीडिओ व्हायरल केला आहे. प्रा. शिल्पा बोडखे यांनी हा व्हीडिओ व्हायरल केला आहे. तसंच २५०-३०० रूपये देऊन कार्यक्रमाला बोलावलं तर हेच होणार ना? पदाधिकारी असं करू शकत नाहीत असंही त्यांनी या व्हीडिओला कॅप्शन देताना म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT