'मळमळतंय, तळमळतंय...', मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमात CM ठाकरेंकडून फडणवीसांना टोमणा..

मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना बरेच टोमणे लगावले आहेत.
cm uddhav thackeray criticized bjp leader devendra fadnavis in metro inauguration program
cm uddhav thackeray criticized bjp leader devendra fadnavis in metro inauguration program(फोटो सौजन्य: CMO)

मुंबई: मुंबईतील मेट्रो 2A आणि 7 या मार्गिकेचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. याच कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर बरंच तोंडसुख घेतलं एवढंच नव्हे तर 'मळमळतंय, तळमळतंय' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना टोमणाही लगावला.

पाहा उद्धव ठाकरे यांनी नेमकी काय टीका केली:

'जशी मेट्रोची आज आपण सुरुवात केली आहे असे अनेक प्रकल्प आपण पाहिलं असेल की, भूमीपूजनं होतात, नारळ फुटतात, जलपूजन होतं. पण प्रकल्पाचा पत्ता नसतो. बरं आता नवीन एक अशी साथ राजकारणात आली आहे. पण त्या व्हायरसचं निदान झालेलं नाही. म्हणजे ते असं की, एकतर तुम्ही काही केलेलं नाही. जर केलं तर ते आम्हीच केलेलं आहे. त्यातूनही समजा काही नवीन काही केलं तर त्यात भ्रष्टाचार केलेलाय. ही अशी एक नवीन साथ आलेली आहे. ती जाहिरात आहे नाही का.. मळमळतंय, तळमळतंय... ती सगळी लक्षणं एकत्र होत आहेत.' अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

'आम्ही काय करतोय.. तुम्ही काय करताय ते जनता बघतेय. मी माझ्या एका भाषणात.. विधानसभेतच बोललो आहे. की, कौरवांचे चाळे बघू न शकणारा हा धृतराष्ट्र नाही हा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. तो पाहतोय की, प्रत्येक जण काय-काय करतोय. 'आम्ही काम करतोय.. मुंबईकरांनी पाहिलंय.' हो.. पाहिलंय ना.. रातोरात झाडांची कत्तल कशी केली हे मुंबईकरांनी पाहिलेलं आहे आणि मुंबईकरांनी लक्षात सुद्धा ठेवलेलं आहे. म्हणजे वाट लागली तरी चालेल.. चुथडा झाला तरी चालेल. पण आम्ही केलं. आम्ही तसं काम करणार नाही. पर्यावरणाचा समतोल कुठेही ढासळू ने देता आम्ही विकास करतो आहोत.' असंही मुख्यमंत्री म्हणाले.

'नाहीतर काय.. आम्ही मोठे रस्ते केले.. बस सुरु केल्या. आता तुम्हाला काय झालं तर तुम्ही जलद गतीने हॉस्पिटलमध्ये जाऊ शकता. हा विकास नाही मी मानत. हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ येऊच नये आणि तुम्ही आनंदात आयुष्य जगावं याला म्हणतात विकास. त्यादृष्टीने जर का सुविधा दिल्या तर त्याला म्हणतात विकास.'

'चला मी म्हणतो या मेट्रोचं काय.. आणखी काय कामं केली असतील या सगळ्याचं श्रेय जे-जे ओरडतायेत ना त्यांना मी देऊन टाकायला तयार आहे. बुलेट ट्रेन हा एक प्रकल्प आहे. बुलेट ट्रेनच्या हा आग्रह चालला आहे.. मुंबईची जी लाखमोलाची जमीन आहे तिथे आपण आर्थिक केंद्र करत होतो ती जागा यांनी बुलेट ट्रेनसाठी घेतली. अहमदाबाद ते मुंबई ही जी बुलेट ट्रेन होतेय तिचा तुम्हाला काय उपयोग आहे?'

'मुंबईबाबत जर का प्रेम असेल तर कांजूरची ओसाड पडलेली जमीन का नाही देत? ती जर का जमीन दिली तर मेट्रो बदलापूर-अंबरनाथ पर्यंत जाऊ शकते. त्यामुळे ती जागा आम्हाला द्या.'

'निदान एवढं तरी आम्हाला श्रेय द्या. तुम्ही ज्या गोष्टींची सुरुवात केली होती ते आडमुठेपणाने आम्ही अडवून तर नाही ना ठेवलं. ते काम अडवून ठेवलं नाही तर पुढे नेलं. जसं समृद्धी महामार्ग आहे. माझी तरी अशी अपेक्षा अशी होती की, पहिली बुलेट ट्रेन जर मुंबईत करायची होती तर अहमदाबाद मुंबई न करता राजाधानी आणि उपराजधानी म्हणजे मुंबई-नागपूर जोडण्याचं काम करायला पाहिजे होतं.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमातच भाजपचा खरपूस समाचार घेतला.

cm uddhav thackeray criticized bjp leader devendra fadnavis in metro inauguration program
गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर दोन नवीन मेट्रो सेवा मुंबईकरांच्या भेटीला

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in