'आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो.. असं नाही करायचं सुधीरभाऊ', मुख्यमंत्र्यांचा जोरदार टोला

विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी देखील सुरुवातीलाच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला.
cm uddhav thackeray criticized bjp mla sudhir mungantiwar wine sell from grocery store maharashtra
cm uddhav thackeray criticized bjp mla sudhir mungantiwar wine sell from grocery store maharashtra(फोटो सौजन्य: विधानसभा)

मुंबई: राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच वाईन विक्रीचा एक निर्णय घेतला होता. ज्यावरुन भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. पण आता मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत उत्तर दिलं आहे. हे उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी सुधीर मुनगंटीवार यांना चिमटे काढले आहेत.

महाराष्ट्राला मद्यराष्ट्र म्हणाऱ्यांनी शेजारच्या राज्यात जिथे (भाजपची) सत्ता आहे तिथे किती दारुची विक्री होते. हे पाहावं त्यामुळे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो... असं करता येणार नाही. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

पाहा मद्यविक्रीच्या मुद्द्यावरुन टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले:

'नाही म्हटले तरी थोडेथोडे आरोप झाले. सुधीरभाऊ तुम्ही दरवेळेला छान काही तरी बोलता आणि मला छान काही तरी उत्तर द्यावं लागतं. तुम्ही असं म्हणालात की, हे शासन कोणाचं आहे तर हे बेवड्यांचं शासन आहे. आपल्या महाराष्ट्राला शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. त्याला तुम्ही मद्यराष्ट्र म्हणालात. आता वाईन जी आहे ती काही किराणा मालाच्या दुकानात किंवा वाण्याच्या दुकानात नाही मिळत.'

'जिथे सुपरमार्केट आहे तिथे वाईन मिळते. आपण नेहमी चंद्रपूरचे मुद्दे मांडता. आपल्या बाजूला मध्यप्रदेश आहे. त्यांची जी काही आकडेवारी आहे ती मी विचारतो मग त्याला मद्यप्रदेश म्हणणार का तुम्ही?'

(त्यांचा संबंध नाहीए.. मुनगंटीवारांकडून उत्तर)

'संबंध नाहीए.. पण त्यांनी जे काही केलं आहे. असं नाहीए. तुम्ही.. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो.. असं नाही करायचं.'

cm uddhav thackeray criticized bjp mla sudhir mungantiwar wine sell from grocery store maharashtra
सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय सरकार मागे घेणार? शरद पवारांचं सूचक विधान

'देशात एक लाख लोकसंख्येचा मागे मद्यविक्रीची दुकाने महाराष्ट्रात सर्वात कमी आहेत. कर्नाटक किती आहेत कोणाचं सरकार आहे.. तिकडे 7.10, मध्यप्रदेश 5.07 आता याचं उत्तर द्या.. उत्तरप्रदेश तिकडे 2.60 तामिळनाडू 9.43 हे सगळं पाहिल्यानंतर लगेच आपल्या राज्याची बदनामी करुन टाकायची. हे योग्य नाही.'

'तुम्ही आमच्यावर टीका करा. पण ज्या महाराष्ट्रात काय विकास झाला ते राज्यपाल सांगत होते ते तुम्ही समोर येऊ देत नाही. पण असं एक-एक नावं देऊन तुम्ही महाराष्ट्राला बदनाम करता आहात हे योग्य नाही. या सगळ्याची दखल नागरिक घेत असतात.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुनगंटीवार आणि भाजपवर जोरदार निशाणा ठरला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in