CM Uddhav Thackeray भर पावसात स्वतः ड्राईव्ह करत पंढरपूरला...

रात्री 2.20 च्या सुमारास पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात होणार शासकीय महापूजा
CM Uddhav Thackeray भर पावसात स्वतः ड्राईव्ह करत पंढरपूरला...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसात स्वतः गाडी चालवत पंढरपूरला निघाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते पंढरपूरला विठ्ठलाची पूजा करणार आहेत. 20 जुलैला म्हणजेच मंगळवारी आषाढी एकादशी असल्याने मुख्यमंत्र्यांचा ताफा दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पंढरपूरला रवाना झाला आहे. मुंबईत कोसळता पाऊस आणि खराब हवामान यामुळे त्यांना विमानाने पंढरपूरला जाणं शक्य नसल्याने मुख्यमंत्री स्वतः ड्राईव्ह करतच पंढरपूरला निघाले आहेत. गेल्या वर्षीही ते स्वतः ड्राईव्ह करत पंढरपूरला कारनेच गेले होते. यावर्षीही ते पुन्हा एकदा आपल्या कारनेच पंढरपूरला रवाना झाले आहेत.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ताफा पंढरपूरच्या दिशेने जात असतानाची दृश्य दुपारी साडेतीन-चारच्या सुमारास प्रसारमाध्यमांच्या कॅमेरात कैद झाली आहे. आज मध्यरात्री अडीच वाजता विठ्ठलाची जी महापूजा होणार आहे त्यासाठी मुख्यमंत्री पंढरपूरला पोहचत आहेत. मुख्यमंत्री पहाटे दोनच्या सुमारास शासकीय विश्रामगृहातून रूक्मिणी मंदिरात जातील. त्यानंतर 2 वाजून 10 मिनिटांनी विठ्ठल रूक्मिणी मंदिरात दाखल होतील. रात्री 2 वाजून 20 मिनिटांनी होणाऱ्या शासकीय महापूजेला ते उपस्थित असतील. त्यानंतर ते सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना होतील. मुख्यमंत्र्यांच्या या ताफ्यासोबत पोलिसांच्या बऱ्याच गाड्याही आहेत. मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली असून त्यांच्या ताफ्यासोबत असणाऱ्या वाहनांची माहितीही सोलापूर जिल्हा प्रशासनाला देण्यात आलीय.

मागील वर्षी पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह पंढरपूरला गेले शासकीय पूजेसाठी उपस्थित राहिले होते. त्यावेळी मुंबई ते पंढरपूर या प्रवासात मुख्यमंत्र्यांनी स्वतःच कार चालवली होती. स्वतः कार चालवत पंढरपूरला महापूजेसाठी जाणारे ते पहिलेच मुख्यमंत्री ठरले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मु्ंबईतून स्वतः गाडी चालवत पंढरपूरात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. आठ ते नऊ तास कार चालवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मागील वर्षी अशाचप्रकारे रात्री साडेआठच्या सुमारास पंढरपूरात दाखल झाले. त्यानंतर मध्यरात्री अडीच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा पार पडली होती. अशाच प्रकारे यंदाही मुख्यमंत्री स्वत: गाडी चालवत पंढरपूरला गेले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in