CM Thackeray: पवारांकडून उद्घाटन, मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; उद्धव ठाकरेंचा राष्ट्रवादीला धक्का

CM Deferred the decision Mhada flats to Tata Hospital: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्घाटन केलेल्या उपक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे.
CM Thackeray: पवारांकडून उद्घाटन, मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; उद्धव ठाकरेंचा राष्ट्रवादीला धक्का

मुंबई: महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते ज्या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं त्यालाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आता स्थगिती दिली असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी टाटा कॅन्सर रुग्णालयाला (Tata Cancer Hospital) ज्या 100 सदनिका (100 Flats) देण्याचा निर्णय घेतला होता आणि ज्या उपक्रमाचं उद्घाटन स्वत: शरद पवार यांनी केलं होतं त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे.

टाटा कॅन्सर रुग्णालय सदनिका हे जितेंद्र आव्हाड यांचं हे ड्रिम प्रोजेक्ट मानलं जात आहे. त्यामुळे या उपक्रमाचं उद्घाटन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते केलं होतं. यावेळी त्यांनी या सदनिकांच्या चाव्या शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर रुग्णालयाचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे सुपूर्द केल्या होत्या. पण याच निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

CM Thackeray: पवारांकडून उद्घाटन, मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; उद्धव ठाकरेंचा राष्ट्रवादीला धक्का
देवेंद्र फडणवीस आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात रंगलं ट्विटर वॉर.. जाणून घ्या कारण

मुख्यमंत्री कार्यालयाकडून का देण्यात आली स्थगिती?

शिवसेनेचे शिवडी मतदारसंघातील आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यामुळे मुख्यमंत्री कार्यालयाकडून या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल तपासून सादर करण्यात यावा असा शेरा देखील देण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाडांनी उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचे देखील मानले होते आभार

दरम्यान, जेव्हा हा उद्घाटन सोहळा पार पडला होता तेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार देखील मानले होते. यावेळी त्यांनी असंही म्हटलं होतं की, या उपक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे.

'आज आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेबांनी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी 100 खोल्या सुपूर्द केल्या. माणूसकी धर्माला शोभेल असा हा कार्यक्रम आज पार पडला. खासकरून मुख्यमंत्री सन्मा. श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत या उपक्रमाला परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार!'

अशावेळी आता अचानक मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला स्थगिती का दिली? हा प्रश्न विचारण्यात येत आहे. कारण उपक्रमाला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली असल्याचं स्वत: जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं.

CM Thackeray: पवारांकडून उद्घाटन, मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; उद्धव ठाकरेंचा राष्ट्रवादीला धक्का
Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड म्हणतात, हे सहन करावं लागेल...

टाटा कॅन्सर रुग्णालयाला 100 खोल्या देण्याचा निर्णय का घेण्यात आला होता?

टाटा कॅन्सर रुग्णालयातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकं उपचारासाठी येतात. अशावेळी रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांची मुंबईत सहजासहजी राहण्याची सोय होत नाही. त्यामुळे अनेकदा नातेवाईकांना जवळच्या फुटपाथवर अनेक दिवस घालवावे लागतात. याच दृष्टीने रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसौय होऊ नये यासाठी राज्य सरकारने त्यांना 100 खोल्या देण्याचा निर्णय घेतला होता. या सदनिका म्हाडाच्या मार्फत उभारण्यात आल्या आहेत.

16 मे 2021 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे 100 खोल्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या. तसंच या 100 सदनिकांच्या देखभालीची जबाबदारी देखील टाटा रुग्णालयाकडेच सोपविण्यात आली होती.

CM Thackeray: पवारांकडून उद्घाटन, मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती; उद्धव ठाकरेंचा राष्ट्रवादीला धक्का
जितेंद्र आव्हाडांना विस्मरणाचा रोग झालाय – देवेंद्र फडणवीस

दरम्यान, अचानक मुख्यमंत्र्यांनी स्थगितीचा निर्णय का घेतला असावा याबाबत जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना संभ्रम निर्माण झाला आहे. दुसरीकडे याबाबत टीव्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना जितेंद्र आव्हाड असं म्हणाले आहेत की, 'हा निर्णय एका उदात्त भावनेनं घेतला होता. यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही. पण या निर्णयाला स्थगिती देणं ही दुर्देवाची बाब आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांपासून कुठलीही गोष्ट लपवून ठेवली नव्हती. पण याविषयी काही गैरसमज झाले असावे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु.' असं आव्हाड म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in