CM Uddhav Thackeray: मंदिरं सुरु होताच पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांसह घेतलं देवीचं दर्शन

CM Uddhav Thackeray visits Mumba Devi: राज्यभरातील प्रार्थनास्थळं आजपासून सुरु करण्यात आली आहे. यावेळी स्वत: मुख्यमंत्र्यांनी सपत्नीक मुंबादेवीचं दर्शन घेतलं.
CM Uddhav Thackeray: मंदिरं सुरु होताच पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांसह घेतलं देवीचं दर्शन
CM Uddhav Thackeray Visits Mumba devi temple with Family(फोटो सौजन्य: CMO Maharashtra)

मुंबई: घटस्थापनेपासून राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय झाला असून आज (7 ऑक्टोबर) सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत मुंबादेवी येथे दर्शन घेतले. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या.

कोरोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे, अशी प्रार्थना मुंबादेवीच्या चरणी आपण केली असून धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणे सुरूच ठेवण्याची जबाबदारी सर्वानी पार पाडली पाहिजे. असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.

सर्वच धार्मिक स्थळांवर विश्वस्त व पुजारी यांनी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात ठेवून शिस्तबद्धरित्या भक्त आणि नागरिकांच्या दर्शनाची व्यवस्था केली तसेच परिसराची वरचेवर स्वच्छता करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, जंतूनाशकांचा वापर करणे असे केले तर एक चांगले उदाहरण आपण घालून देऊ शकतो. असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी सिद्धिविनायक तसेच इतरही काही प्रमुख मंदिरांमध्ये क्यूआर कोड व तंत्रज्ञान वापरून दर्शन व्यवस्था केल्याबद्दलही कौतुक केले आहे.

(फोटो सौजन्य: CMO Maharashtra)

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या बऱ्यापैकी घटली आहे. त्यामुळे शासनाने राज्यातील शाळा आणि मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील शाळा या 4 ऑक्टोबरपासून सुरु झाल्या आहेत. तर मंदिरं घटस्थापनेच्या मुहूर्तावर म्हणजे 7 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आली आहेत.

भाजप आणि मनसेने मंदिरं सुरु करण्यासाठी केलं होतं आंदोलन:

भाजपने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शंखनाद आंदोलन केलं होतं. तसंच मनसेनेही आंदोलन करत मंदिरं उघडण्याची मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरं नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून उघडण्यात येतील असं जाहीर केलं होतं.

CM Uddhav Thackeray Visits Mumba devi temple with Family
मंदिरं उघडण्यासाठी सरकारला अडचण काय आहे? अण्णा हजारेंचा सरकारला सवाल

महाराष्ट्रात हॉटेल्स, बार, रेस्तराँ, दारूची दुकानं, मॉल्स हे सगळं सुरू करण्यात आलं होतं. मात्र मंदिरं बंद ठेवण्यात आली होती. धार्मिक स्थळं बंद होती. त्यामुळे विरोधकांसह सामान्य जनतेतही राज्य सरकारविरोधात नाराजी वाढत होती. भाजप, मनसे यांच्यासह अनेक संघटनांनी घंटानाद आंदोलन केली होती.

तरीही राज्य सरकारने मंदिरं सुरू करण्याचा निर्णय घेतला नव्हता. गणेशोत्सव काळातही मंदिरं बंदच होती. गणेशोत्सवाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता घटस्थापनेपासून सर्वांसाठी धार्मिक स्थळं सुरू झाली आहेत. ज्याबाबत सर्वांनीच आनंद व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.