CNG, Petrol-Diesel Price: CNG आज पुन्हा महागलं, एक किलो CNG साठी किती पैसे मोजावे लागणार?
cng rates hike rs 3 per kg petrol diesel rates today 7 april 2022 check latest fuel price maharashtra mumbai(प्रातिनिधिक फोटो)

CNG, Petrol-Diesel Price: CNG आज पुन्हा महागलं, एक किलो CNG साठी किती पैसे मोजावे लागणार?

CNG, Petrol-Diesel Price Hike: CNG च्या किंमती आज पुन्हा एकदा महागल्या आहेत. तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मात्र वाढलेल्या नाहीत.

CNG Price Increased: जनतेला गुरुवारी पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (CNG) दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. आज (7 एप्रिल) सीएनजीच्या दरात किलोमागे अडीच रुपयांनी वाढ झाली आहे. एका आठवड्यात आतापर्यंत सीएनजीवर तब्बल 9.10 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

मात्र, गुरुवारी पेट्रोल-डिझेलवर दिलासा मिळाला. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. गेल्या 17 दिवसांत पेट्रोल 10 रुपयांनी महाग झालं आहे. अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलवर जवळजवळ रोज प्रतिलिटर 80 पैशांची वाढ होत आहे.

दुसरीकडे सीएनजीचे दर मात्र सातत्याने वाढत आहेत. काल (6 एप्रिल) सीएनजीच्या दरात किलोमागे 2.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आज 2.5 रुपयांनी वाढल्यानंतर दिल्लीत सीएनजीची किंमत 69.11 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे, तर नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबादमध्ये CNG ची 71.67 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे.

नव्या दरवाढीमुळे मुंबई आणि परिसरात सीएनजीची किंमत 67 रुपये प्रतीकिलो, तर पीएनजीची किंमत 41 रुपये प्रती एससीएमवर पोहोचली आहे.

देशातील अनेक राज्यात सीएनजी प्रचंड महागलं.

यूपीच्या मुझफ्फरनगर, मेरठ आणि शामलीमध्ये सीएनजी 76.34 रुपयांना विकलं जात आहे. गुरुग्राममध्ये सीएनजीची किंमत आज 77.44 रुपये प्रति किलो झाली आहे.

त्याचवेळी आजपासून कर्नाल आणि कैथलमध्ये सीएनजी 77.77 रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. कानपूर, हमीरपूर आणि फतेहपूरबद्दल बोलायचे झाले तर सीएनजीचे दर 3 रुपयांनी वाढल्यानंतर 80.90 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. राजस्थानच्या अजमेर, पाली आणि राजसमंदमध्ये सीएनजीचा दर 79.38 रुपये प्रति किलो झाला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज वाढ झालेली नाही

आज पेट्रोल आणि डिझेलचे दर न वाढवल्यामुळे दिल्लीसह सर्व महानगरांमध्ये दरात बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत आज पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 104.77 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.

कोलकाताबद्दल बोलायचे झाले तर इथे पेट्रोल 115.12 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. डिझेल 99.83 प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. याशिवाय चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 110.85 रुपये प्रति लिटर आहे तर डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

महत्त्वाच्या शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

शहरं पेट्रोल डिझेल

  • दिल्ली 105.41 96.67

  • मुंबई 120.51 104.77

  • कोलकाता 115. 12 99.83

  • चेन्नई 110.85 100.94

cng rates hike rs 3 per kg petrol diesel rates today 7 april 2022 check latest fuel price maharashtra mumbai
पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा भडका! १६ दिवसांतच लिटरमागे १० रुपयांनी महागलं इंधन

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारे तपासा

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज अपडेट केली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीची माहिती अपडेट करतात.

Related Stories

No stories found.