राज्यात उद्यापासून सुरू होणार कॉलेज; विद्यार्थी अन् महाविद्यालयांसाठी काय आहेत नियम?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात शाळांमध्ये किलबिलाट सुरू झाल्यानंतर आता महाविद्यालयातही गजबजणार आहेत. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये उद्यापासून (20 ऑक्टोबर) सुरू होत आहे.

राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयाचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या आठवड्यात घेतला. यासाठी मार्गदर्शक नियमावलीही तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे या नियमांचं महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना पालन करावं लागणार आहे.

काय आहेत नियम?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ज्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, ते विद्यार्थी व विद्यार्थिनी विद्यापीठ व महाविद्यालयात होणाऱ्या वर्गांना उपस्थित राहू शकतात. ज्यांनी लस घेतलेली नाही, त्यांच्याकरिता विद्यापीठाने संबंधित संस्थांचे प्रमुख/महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्या मदतीने स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवून लसीकरण पूर्ण करुन घ्यावे.

विद्यापीठ व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही लसीकरण प्राधान्याने करुन घेण्यात यावे.

ADVERTISEMENT

विद्यापीठ आणि महाविद्यालयातील वर्ग पूर्ण की 50 टक्के क्षमतेनं सुरु करायचे, याबाबत विद्यापाठ स्थानिक प्राधिकरणांशी विचारविनिमय निर्णय घेणार.

ADVERTISEMENT

ज्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे; अशा ठिकाणी स्थानिक प्रशासनाशी चर्चा करुनच महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्याचं शासनानं म्हटलं आहे.

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थिती पाहून नियमावली बदलण्याचा अधिकारी विद्यापीठं, महाविद्यालयांकडे असेल. परिस्थितीनुसार प्रत्येक जिल्ह्याला वेगवेगळी नियमावली तयार करायची आहे.

जे विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात उपस्थित राहू शकणार नाहीत. अशा विद्यार्थ्यांची ऑनलाईन सोय महाविद्यालयांना करुन द्यावी लागणार.

दोन डोस घेतलेल्या विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आणि पालकांनी कोरोना नियम पाळणं बंधनकारक.

18 वर्षा खालील विद्यार्थ्यांना लसीकरणाची आवश्यकता नाही.

मुंबई महानगर क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी लोकल ट्रेनने प्रवास करणे सोयीचं असल्यानं विद्यार्थ्यांना प्रवासाची परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव उच्च व तंत्रशिक्षण विभाग मुख्य सचिवांना पाठवणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT