...हे काँग्रेसचं दुर्दैव; कपिल सिब्बलांनी पक्ष नेतृत्वाच्या डोळ्यात घातलं अंजन

kapil sibal press conference : 'वाट बघण्याची पण एक मर्यादा असते. आम्ही कधीपर्यंत वाट बघायची.
...हे काँग्रेसचं दुर्दैव; कपिल सिब्बलांनी पक्ष नेतृत्वाच्या डोळ्यात घातलं अंजन
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल. AajTak

मध्य प्रदेश, राजस्थान आणि आता पंजाब काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. पंजाबमध्ये झालेला नेतृत्व बदल आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिद्धू यांनी दिलेला राजीनामा, यावरून काँग्रेसमध्ये घमासान सुरू असतानाच पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पक्ष नेतृत्वाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे.

माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसमबद्दलची भूमिका मांडली. काँग्रेसकडे अध्यक्ष नसणं, हे दुर्दैव आहे, असं सांगत त्यांनी काँग्रेस कार्यकारी समिती बैठक बोलवण्याच्या मुद्द्यावर भर दिला.

सिब्बल म्हणाले, 'मी त्या काँग्रेस सदस्यांचा प्रतिनिधी म्हणून बोलत आहे, ज्यांनी मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये काँग्रेसच्या कार्यकारी समिती आणि पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीला अध्यक्ष निवडीबद्दल पत्र लिहिलं होतं आणि अजूनपर्यंत त्याची वाट बघत आहोत', असं सांगत सिब्बल यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

'वाट बघण्याची पण एक हद्द असते. आम्ही कधीपर्यंत वाट बघायची. पक्षाचं मजबूत संघटन आम्हाला हवं आहे. काहीतरी चर्चा व्हायला हवी. केंद्रीय कार्यकारी समितीमध्ये कोणत्यातरी मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी. पंजाबमधील परिस्थितीवर चर्चा व्हायला हवी', असं सिब्बल म्हणाले.

'आम्ही पक्षाच्या कुणाच्याही विरोधात नाही आहोत. आम्ही पक्षासोबतच आहोत. पण वस्तुस्थिती अशी आहे की, आमच्या पक्षाला निवडलेला अध्यक्षच नाही. राज्य स्तरांवरील काँग्रेस समित्यांना दिल्लीतून नियंत्रण करायला नको', असं म्हणत सिब्बल यांनी पंजाबमधील घडामोडींवरून अप्रत्यक्षपणे काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधला.

"मी अतिशय जड अंतःकरणाने इथे आलोय. गौरवशाली इतिहास राहिलेल्या पक्षाचा मी भाग आहे आणि सध्या पक्षाची जी स्थिती आहे, ती बघू शकत नाही. आम्ही संकटांचा सामना करत आहोत आणि आज पक्ष ज्या परिस्थितीत आहे, तिथे असायला नको होता', असं सिब्बल म्हणाले.

"लोक आम्हाला सोडून जात आहेत. सुष्मिताजी निघून गेल्या. ज्योतिरादित्य शिंदे निघून गेले. जितीन प्रसाद सोडून गेले. केरळ से सुधीरन पक्ष सोडून गेले. आता प्रश्न इतकाच आहे की, लोक का पक्ष सोडून जात आहेत? त्याचं एक सुसंगत उत्तर असायला हवं. याबद्दल कार्यकारी समितीने चर्चा करायला हवी', असं सिब्बल म्हणाले.

"जे काँग्रेस सोडून गेले त्यांनी परत यावं"

'काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षा जाणाऱ्यांपैकी आम्ही नाही आहोत. पण विरोधाभास हा आहे की, जे लोक केंद्रीय नेतृत्वाच्या जवळचे होते, तेच लोक पक्ष सोडून जात आहेत. मी त्या नेत्यांना आवाहन करतो की त्यांनी परत यावं. काँग्रेस एकमेव पक्ष आहे, जो देशाला वाचवू शकतो', अशी साद सिब्बल यांनी पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना घातली.

Related Stories

No stories found.