'ईडी जिसकी मम्मी है, यह सरकार...', आमदार प्रणिती शिंदेंची नवी घोषणा

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप विरोधात सोलापूरमध्ये जोरदार आंदोलन केलं यावेळी ईडीवरुन त्यांनी मोदी सरकारवर बरीच टीकाही केली
'ईडी जिसकी मम्मी है, यह सरकार...', आमदार प्रणिती शिंदेंची नवी घोषणा
congress mla praniti shinde agitated against the modi govt in solapur

विजयकुमार बाबर, सोलापूर: सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी बुधवारी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरुन जोरदार आंदोलन केलं. राज्यात ईडीच्या माध्यमातून ज्या कारवाया होत आहेत त्याकडे लक्ष वेधत आमदार प्रणिती शिंदे यांनी काल(6 एप्रिल) सोलापुरात रस्त्यावर उतरुन निषेध केला आहे.

या आंदोलनाच्या निमित्ताने आमदार शिंदे यांनी 'ईडी जिसकी मम्मी है, ओ सरकार निक्कम्मी है', अशी नवी घोषणा दिली आहे. या आंदोलनात नव्या घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

सोलापुरात काँग्रेस आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आक्रमक झाली असून वॉर्ड स्तरावर आंदोलनं केली जात आहेत. ही आंदोलनं करताना नवनव्या घोषणा, लोकांच्या मनातील असंतोष मांडण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. त्यावेळी महागाईच्या मुद्द्यावर काँग्रेसचे यूपीए सरकार आणि भाजपचे मोदी सरकार यांच्या भावाढीचा लेखाजोखा मांडला जात आहे.

बुधवारी पार पडलेल्या आंदोलनास्थळी आमदार प्रणिती यांनी, डॉ. मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान असताना गॅस सिलेंडर केवळ चारशे रुपये होता. त्यावेळी भाजपने त्यांना बांगड्या पाठवल्या होत्या. आता आम्ही यांना काय पाठवायचे? असा प्रश्न उपस्थित करत ईडीच्या ज्या कारवाया सुरू आहेत त्यावरून भाजप ईडीचा गैरवापर करत असल्याचे  टीका त्यांनी केली आहे.

congress mla praniti shinde agitated against the modi govt in solapur
ताटं वाजवल्यामुळे देशात अवदसा आली ! प्रणिती शिंदेंची PM Narendra Modi यांच्यावर घणाघाती टीका

पाहा नेमकं काय म्हणाल्या प्रणिती शिंदे

आता ते ज्या पद्धतीने ईडीचा वापर करत आहेत हाच गेम त्यांच्यावर उलटणार आहे. आता ते होताना देखील दिसतंय. शेवटी या सगळ्या संस्था या स्वतंत्र आहेत. त्याच्यावर कोणाचा दबाव असू नये. काँग्रेसने तर त्याचा वापर कधी केला नाही आणि आम्ही आमची संस्कृतीपण नाही तसं करण्याची.

ईडी हे खूप महत्त्वाचे ठराविक अशा गुन्ह्याचा तपास करत असतो आणि त्यांनी देखील तेच पाहायला पाहिजे. पण आता काय कोणी छोटसं काही केलं तरी हे लोकं ईडी आणतात. परवा चंद्रकांत पाटील कोल्हापुरात म्हणाले की, 1000 रुपयांसाठी देखील आम्ही ईडीला बोलावू. म्हणजे यावरुनच तुम्ही काय ते लक्षात घ्या.

जसं मी म्हणाले की, MIM किंवा वंचित हे B टीम आहे तसं मनसे ही C टीम आहे. मुद्दे सगळे बाजूला. जे लोकं एकेकाळी म्हणत होते की, लाव रे तो व्हीडिओ.. आता त्यांचेच गुण गातायेत. एकंदरीत आता कळतंय की, यांची चाल म्हणजे फोडा आणि राज्य करा हीच आहे. निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वाचे मुद्दे बाजूला करुन हेच एक षडयंत्र आहे, हीच त्यांची चाल आहे. ज्याचा आम्ही पूर्णपणे धिक्कार करतो. त्यामुळे आता तरी सर्वसामान्यांचे डोळे उघडले पाहिजे.

Related Stories

No stories found.