'काँग्रेसमधील नेतृत्वाच्या अभावामुळे कार्यकर्ते संभ्रमात, त्यांनी आता...' संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य

जाणून घ्या संजय राऊत यांनी नेमकं काय म्हटलं आहे?
'काँग्रेसमधील नेतृत्वाच्या अभावामुळे कार्यकर्ते संभ्रमात, त्यांनी आता...' संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य

काँग्रेस पक्षात देशपातळीवर नेतृत्व नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यांनी लवकारात लवकर आपल्या पक्षातले वाद संपवून या सगळ्यावर पर्याय काढावा असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. काँग्रेस हा देशातला सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांनी कुणाला अध्यक्ष नेमावं, कुणाला नाही याबाबत मी भाष्य करणार नाही. मात्र त्यावेळी ही गोष्टही मान्य केली पाहिजे की काँग्रेस पक्षाला एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. ते नसल्याने सध्या काँग्रेसमधले कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

देशाच्या जडणघडणीत काँग्रेसच पक्षाचा मोठा सहभाग आहे. 60 वर्षांपेक्षा जास्त काळ त्यांनी देशावर राज्य केलंय. देशाला अनेक मोठे नेते दिले आहेत. अशावेळी या पक्षाला नेतृत्व नसल्याने याविषयी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. काँग्रेस पक्षाला अध्यक्षपद नाही ते द्यावे अशी मागणी केली तर ते योग्य आहे.

पुढे ते म्हणाले, राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यानंतर काँग्रेस नेतृत्वहीन झाला. एखादा पक्ष नेतृत्वहीन झाला की भाजपसारखे इतर पक्षही त्याचा फायदा घेतात. कॉंग्रेस पक्ष हा या देशातल्या प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राहीला नाही तर भविष्यामध्ये त्यांना राजकारण करता येणार नाही.अशा वेळा काँग्रेस नेतृत्वाने अध्यक्षपदाचा विषयी लवकरात लवकर मार्गी लावला तर नक्कीच त्यातून देशाला आणि विरोधी पक्षाच्या आघाडीला पुढे जाता येईल, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

'काँग्रेसमधील नेतृत्वाच्या अभावामुळे कार्यकर्ते संभ्रमात, त्यांनी आता...' संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य
काँग्रेस पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आहे का?

काँग्रेस पक्षात बंडाची तयारी सुरू आहे का? असा प्रश्न निर्माण होतो आहे कारण कपिल सिब्बल यांनी घेतलेली परिषद. पक्षाला अध्यक्षच नाही त्यामुळे निर्णय कोण घेतंय हे आम्हाला माहित आहेही आणि नाहीही.. अशा काहीशा द्विधा मनस्थितीत काँग्रेसचे हे दिग्गज आहेत. याबाबत मनिष तिवारी यांना विचारलं असता त्यांचं म्हणणं हे आहे की 'काँग्रेसमध्ये राहून आम्ही काँग्रेसला वाचवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे' असं G23 मधल्या नेत्यांनीही वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पक्षाला कसं वाचवायचं हे आमच्यासमोरचं ध्येय आहे असं मनिष तिवारी म्हणाले आहेत. पंजाबमध्ये अमरिंदर सिंग यांना हटवण्यात आलं आहे. विश्वासात घेतलं गेलं नाही असं दिसतं आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये चाललंय काय हा प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in