जाहिरातीतून सोनिया-राहुल गांधींचं विडंबन, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून कंपनी कार्यालयाची तोडफोड

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खिल्ली उडवणारी जाहिरात बनविणाऱ्या Storia Foods & Beverages या कंपनीच्या मुंबईतील (Mumbai) कार्यालयात आज (27 एप्रिल) दुपारच्या सुमारास युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड तोडफोड केली.

स्टोरीया फूड्सने आपल्या शीतपेयाची जाहिरात करताना राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचं विडंबन केल्याचा आरोप करत काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसून एकच धुडगूस घातला. दरम्यान, या तोडफोडीनंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

स्टोरिया फूड्स या कंपनीने आपल्या शीतपेयासाठी एक जाहिरात बनवली आहे. ज्यामध्ये त्यांनी काँग्रेस माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं विडंबन करत जाहिराती तयार केली होती. ही जाहिरात सोशल मीडियावर शेअर देखील करण्यात आली आहे. या जाहिरातीत राहुल गांधी यांची नक्कल करत स्टोरिया फूड्सने आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग केलं आहे. तसंच जाहिरातीत काही आक्षेपार्ह वक्तव्य देखील करण्यात आली आहेत. त्यामुळे अशा प्रकारची जाहिरात करणाऱ्या स्टोरिया कंपनीच्या कार्यालयात घुसून काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट तोडफोड केली.

पाहा स्टोरिया फूड्सने आपल्या शीतपेयाची नेमकी कशी जाहिरात केली आहे, ज्यावरुन आता वाद उफाळून आल आहे:

ADVERTISEMENT

फडणवीसांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं, भाई जगताप यांचा टोला

ADVERTISEMENT

मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांच्याकडून तोडफोडीचं समर्थन

मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस नितीन सावंत यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या तोडफोडीचं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी समर्थन केलं आहे. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे की, ‘आमचे नेते राहुल गांधी आणि अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल जाहिराती आक्षेपार्ह गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत. हे आम्ही कधीही सहन करणार नाही. त्यांना आम्ही चांगलाच धडा शिकवलेला आहे. ही जाहिरात ताबडतोब बंद झाली पाहिजे तसंत स्टोरिया फुड्स कंपनीने या सर्व प्रकाराबाबत जाहीर माफी मागितली पाहिजे. नाहीतर मुंबई काँग्रेस याप्रकरणी अधिक तीव्र आंदोलन छेडेल.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

याचबाबत भाई जगताप यांनी ट्विटरवरुन देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘असले घाणेरडे धंदे खपवून घेतले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी’ अशा शब्दात त्यांनी स्टोरिया कंपनीला सुनावलं आहे. तसंच स्टोरिया कंपनीचं कार्यालय देखील बंद पाडू अशा इशारा देखील भाई जगताप यांनी दिला आहे.

अमृता फडणवीस म्हणाल्या… ‘ए भाई, तू कोण पण असशील!’

दरम्यान, याप्रकरणी तोडफोड करणाऱ्या कार्यंकर्त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, काँग्रेस कार्यकर्ते अशा प्रकारे व्यक्त झाल्याने आता याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आता या सगळ्या घडामोडीनंतर नवं राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT