Cooking Oil Price : दिवाळीत खाद्य तेल होणार स्वस्त, कारण...;

सॉल्व्हेंट एक्सस्ट्रॅक्टर असोसिएशन म्हणजेच SEA चे (Solvent Extractor's Association of India) अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी दिली महत्त्वाची माहिती...
Cooking Oil Price : दिवाळीत खाद्य तेल होणार स्वस्त, कारण...;
खाद्य तेलाचे दर घसरणार.

कोरोना आणि लॉकडाऊनच्या मोठ्या कालखंडानंतर दोन वर्षांनी दिवाळीनिमित्त हर्षोल्हासाचे वातावरण आहे, तर दुसरीकडे महागाईचे सर्वसामान्यांना तडाखे बसत आहेत. भाजीपाल्यासह अनेक जीवनावश्यक वस्तुंचे भाव प्रचंड वाढले असून, खाद्य तेलाच्या बाबतीत काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (Cooking Oil Price)

दिवाळीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अनेक खाद्य तेल उत्पादक कंपन्या तेलाचे दर कमी केले आहेत. तर उवर्रित कंपन्या दर कमी करण्याच्या विचारात आहेत. अदानी विलमार आणि रुची सोया या तेल उत्पादक कंपन्यांनी तेलाचे दर कमी केले आहेत. या कंपन्यांनी तेलाचे दर लिटरमागे चार ते सात रुपयांनी कमी केले आहेत.

या कंपन्यांनी घटवले तेलाचे दर

देशातील अनेक खाद्य तेल उत्पादक कंपन्यांनी दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यात जेमिनी एडिबल्स अॅण्ड फॅट्स (हैदराबाद), मोदी नॅचरल्स (दिल्ली), गोकुळ रिफ्यॉल्स अॅण्ड सॉल्व्हेट (सिधपूर), विजय सॉलवेक्स, गोकुळ अॅग्रो रिसोर्स आणि एनके प्रोटीन प्रायव्हेट लिमिटेड (अहमदाबाद) यांनी होलसेल तेलाचे दर कमी केले आहेत. तेलाच्या दरात प्रति टन 4000 हजार ते 7000 पर्यंत कपात केली जाण्याची आशा आहे. त्यामुळे खाद्य तेल लिटरमागे 4 ते 7 रुपयांनी कमी होऊ शकतं.

खाद्य तेलाच्या दरांबाबत सॉल्व्हेंट एक्सस्ट्रॅक्टर असोसिएशन म्हणजेच SEA चे (Solvent Extractor's Association of India) अध्यक्ष अतुल चतुर्वेदी यांनी माहिती दिली. "संघटनेनं खाद्य तेल उत्पादक कंपन्यांना दर कमी करण्याचं आवाहन केलं होतं. आवाहनाला प्रतिसाद देत कंपन्यांनी प्रतिटन 4000 ते 7000 हजाराच्या दरम्यान कपात करणार आहे. त्याचा परिणाम किरकोळ बाजारात तेलाच्या किंमती चार ते सात रुपयांनी कमी होऊ शकतात", असं चतुर्वेदी म्हणाले.

"या वर्षी भूईमूग आणि सोयाबीनचं उत्पादन चांगलं झालं आहे. मोहरीची पेरणीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. उत्पादन चांगलं होईल अशी आशा आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातही पुरवठ्यातील अडथळे कमी होत असून, यामुळे येत्या काही दिवसांत खाद्य तेलाचे दर कमी होऊ शकतात", असं चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.

"आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्य तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या. याचा परिणाम स्थानिक बाजारावरही झाला आहे. केंद्र सरकारने खाद्य तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी तेल साठवणुकीवर 31 मार्चपर्यंत मर्यादा घातल्या आहेत. यातून काही आयात-निर्यातदारांना सुट दिलेली आहे", अशी माहितीही चतुर्वेदींनी दिली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in