Covid 19: ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर, एका दिवसात सापडले तब्बल 1 लाख नवे रुग्ण; महाराष्ट्रात काय परिस्थिती?

Covid 19: ब्रिटनमध्ये एका दिवसात तब्बल 1 लाखांहून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे तेथील प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
Covid 19: ब्रिटनमध्ये कोरोनाचा कहर, एका दिवसात सापडले तब्बल 1 लाख नवे रुग्ण; महाराष्ट्रात काय परिस्थिती?
corona breaks record in uk more than one lakh infected patients found in a day what is the situation in maharashtra(प्रातिनिधिक फोटो)

लंडन: कोव्हिड-19 ने जगातील विविध देशांमध्ये पुन्हा एकदा कहर केला आहे. सध्या युरोपातील ब्रिटनमध्ये कोरोनाची पुन्हा नवी लाट आल्याचं स्पष्टपणे दिसते आहे. कारण, गेल्या 24 तासात येथे कोरोनाचे तब्बल एक लाखाहून अधिक कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या आठवड्यात येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण 93,045 होते. पण काल हा रेकॉर्ड मोडीत निघाला आहे. ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बुधवारी 106,122 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यासोबतच तेथे 28 दिवसात 140 लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या शेवटच्या लाटेत, यूकेमध्ये एका दिवसात सर्वाधिक रुग्णसंख्या ही 68000 वर पोहोचली होती. पण यावेळी कोरोना दररोज स्वतःचाच विक्रम मोडत आहे. अशीच स्थिती राहिली तर कोरोनाचे स्वरूप काय असेल हे सांगणे कठीण आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांच्या 'गेट बुस्टेड नाऊ' भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. पुढील आठवड्यात अतिरिक्त उपाययोजनांची गरज भासू शकते, असा इशारा त्यांनी दिला आहे. यासोबतच ओमिक्रॉनकडे गांभीर्याने पाहावे लागेल, असेही ते म्हणाले. लसीकरणाबाबत यूकेच्या संयुक्त समिती (JCVI) ने सांगितले की, COVID-19 चा उच्च धोका असलेल्या मुलांना देखील लस दिली जावी.

मंगळवारपर्यंत, यूकेमध्ये 968,665 लोकांना बूस्टर आणि COVID-19 साठी लस देण्यात आली आहे. जेसीव्हीआयने सांगितले की, 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुले जी जोखीम गटात आहेत त्यांना प्राथमिक कोर्स किंवा प्रथमोपचार देण्यात यावे.

कोरोनाचा नवीन धोका लक्षात घेता, तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे की, मुलांना pfizer-biontech च्या कोरोना लसीचा 10-मायक्रोग्राम डोस म्हणजेच प्रौढांना दिलेल्या डोसच्या एक तृतीयांश डोस द्यावा. याव्यतिरिक्त, पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये आठ आठवड्यांचे अंतर असावे.

corona breaks record in uk more than one lakh infected patients found in a day what is the situation in maharashtra
चिंताजनक... Omicron मुळे देशात येणार कोरोनाची महालाट, IIT च्या वैज्ञानिकांचा दावा

महाराष्ट्रात काय स्थिती?

महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 1201 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं होतं. तर 8 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे. तर काल दिवसभरात 953 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 64 लाख 99 हजार 760 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

कालपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 80 लाख 6 हजार 322 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 52 हजार 166 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 75 हजार 273 व्यक्ती होमक्वारंटाईन आहे तर 860 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. काल महाराष्ट्रात एकही नवा ओमिक्रॉन रूग्ण आढळला नाही. आजपर्यंत राज्यात 65 रूग्ण ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत.

राज्यात 1 नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 632 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 121 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in