Corona Child: तिसऱ्या लाटेतील सर्वात चिंताजनक बाब, मागील 7 दिवसात 'एवढ्या' मुलांना कोरोनाची लागण

Corona third wave child: कोरोनोच्या तिसऱ्या लाटेत आता लहान मुलं देखील मोठ्या प्रमाण संक्रमित होत असल्याचं समोर आलं आहे.
Corona Child: तिसऱ्या लाटेतील सर्वात चिंताजनक बाब, मागील 7 दिवसात 'एवढ्या' मुलांना कोरोनाची लागण
corona child third wave wreaks havoc on children 6247 new cases came in 7 days(फोटो सौजन्य: पीटीआय)

नवी दिल्ली: देशात आता कोरोनाची तिसरी लाट आल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोनासोबतच त्याच्या नवीन व्हेरिएंट Omicron मुळे देशभरात झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. एकीकडे 29 डिसेंबरला देशात 9,195 नवे रुग्ण आढळले होते. तर अवघ्या एका आठड्यानंतर गुरुवारी हाच रुग्णांचा आकडा तब्बल 1.17 लाखांच्या घरात पोहचला आहे. म्हणजेच, देशभरात दररोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांची संख्या केवळ 9 दिवसांत जवळपास 13 पटांनी वाढली आहे. या सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी देखील धोकादायक ठरत असल्याचं दिसत आहे.

सध्या देशात गुरुग्राममध्ये लहान मुलांना अधिक कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत गुरुग्राममध्ये शेकडो मुलांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समजतं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 10 वर्षांखालील 170 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. तर त्याचवेळी 11 ते 18 वर्षे वयोगटातील 410 मुलेही या धोकादायक लाटेचा बळी ठरली आहेत. कोव्हिड 19 शी संबंधित सर्व तज्ज्ञांनी तिसर्‍या लाटेत मुलांना कोव्हिडचा संसर्ग अधिक होण्याची भीती आधीच व्यक्त केली होती.

हे लक्षात घ्यावे की कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मुलांना फारसा संसर्ग झाला नव्हता. मात्र यावेळी तिसऱ्या लाटेत आणि त्यातही फक्त मागील 7 दिवसात 6,247 मुलांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. जी अत्यंत चिंतेची बाब असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ज्यामध्ये फक्त गुरुग्रामच्या चंद्रलोक भागात 1 हजारांहून अधिक मुलं संक्रमित झाल्याचं आता समोर आलं आहे.

corona child third wave wreaks havoc on children 6247 new cases came in 7 days
Mumbai COVID Update : रुग्णसंख्यावाढीचा आलेख चढताच, २४ तासांत शहरात २० हजार ९७१ रुग्णांची नोंद

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राममध्ये दररोज सुमारे 892 नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. तर दर तासाला 37 जणांना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे. अशा परिस्थितीत सर्व आता कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र असं असतानाही हा आकडा झपाट्याने वाढत आहे. जी प्रशासनासाठी चिंता वाढवणारी बाब आहे.

corona child third wave wreaks havoc on children 6247 new cases came in 7 days
Covaxin: मुलांना लस कधी मिळणार, किती डोस, कोणाला पहिली संधी?; तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर!

मुंबईत मागील 24 तासात आढळले तब्बल 20 हजार 971 रुग्ण

मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढीचा वेग हा काही केल्या कमी होण्याचं नावच घेत नाहीये. गेल्या 24 तासांमध्ये शहरात 20 हजार 971 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्रात रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्यामुळे प्रशासनासमोरची चिंता ही सातत्याने वाढत चालली आहे. त्यातच गेल्या 24 तासांत 6 जणांचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in