Corona : महाराष्ट्रात पहिल्यांदाच आढळले BA व्हेरिएंटचे रूग्ण, संख्या सलग तिसऱ्या दिवशी पाचशेपार

राज्यात आज बी.ए. ४ व्हेरिअंटचे चार तर बी ए ५ व्हेरिअंटचे तीन रूग्ण आढळले आहेत.
Corona : महाराष्ट्रात पहिल्यांदाच आढळले BA व्हेरिएंटचे रूग्ण, संख्या सलग तिसऱ्या दिवशी पाचशेपार
For the First Time, B.A. 4 and 5 variants Found in Maharashtra

महाराष्ट्रात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले गेलेत. २ एप्रिलपासून म्हणजेच मास्क सक्तीही राज्यात नाही. अशात कोरोनाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यात आज बी.ए. ४ व्हेरिअंटचे चार तर बी ए ५ व्हेरिअंटचे तीन रूग्ण आढळले आहेत. गेल्या तीन दिवसांत राज्यात नव्याने आढळणाऱ्या रूग्णांमध्ये पाचशेच्या वर वाढ झाली आहे. दिवसभरात राज्यात ५२९कोरोना बाधित रूग्णांची नोंद झाली आहे.

For the First Time, B.A. 4 and 5 variants Found in Maharashtra
कोरोना महामारीत आम्ही उत्पन्नांवर पाणी सोडलं, मुंबईतल्या खासगी हॉस्पिटल्सचं म्हणणं चर्चेत

राज्यात पहिल्यांदाच बीए ४ आणि ५ व्हेरिअंट

राज्यात आज आढळेलेले बी. ए. व्हेरिएंटचे सर्व रूग्ण पुणे शहरातील आहेत. यामध्ये चार पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे. या सर्व रूग्णांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत. यात एका नऊ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. त्याने लस घेतलेली नाही. सर्व रूग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. सर्व रूग्णांना आता घरगुती विलिगीकरणात ठेवलं गेलं आहे.

राज्यात २२ मे ते २७ मे कसे वाढले रूग्ण?

२२ मे-३२६ नवे रूग्ण

२३ मे-२०८ नवे रूग्ण

२४ मे-३३८ नवे रूग्ण

२५ मे-३३४ नवे रूग्ण

२६ मे-५५१ नवे रूग्ण

२७ मे-५३६ नवे रूग्ण

महाराष्ट्राचा साप्ताहिक कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १.५९ टक्के आहे. मुंबई, पुण्यात सरासरीपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आढळते आहे. वाढती कोरोना रूग्णसंख्या पाहता योग्य ती खबरदारी घेण्याचं आणि मास्क लावण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

कोरोना पूर्णपणे गेलेला नाही कोरोनाचे नवे स्ट्रेन येतच राहणार असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ही वाढती रुग्ण संख्या काही प्रमाणात चिंतेचं कारण जरी असलं तरी घाबरुन न जाता आपली योग्य ती खबरदारी घ्या, गर्दीत किंवा गरज असेल तिथे मास्क वापरा, स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा हेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

B. A. 4 and 5 are of the Omicron sub lineage, which increases the rate of transmission of the 
virus
B. A. 4 and 5 are of the Omicron sub lineage, which increases the rate of transmission of the virus (फोटो सौजन्य: Jaison G)

राज्यात आज एकूण २७७२ इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 1929 रुग्ण हे मुंबईमध्ये आढळतात. तर त्या खालोखाल पुण्यामध्ये 318 इतके सक्रिय रुग्ण आहेत.

The new variant has been identified in a WGS conducted by the Indian Institute of Science
The new variant has been identified in a WGS conducted by the Indian Institute of Science (प्रातिनिधिक फोटो)

देशातील कोरोना संसर्गात हळूहळू घट होताना दिसत आहे. आधीच्या दिवसाच्या तुलनेत आज नवीन कोरोनाबाधितांमध्ये काहीशी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत २ हजार ६८५ नवीन रुग्ण कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या १६ हजारांवर पोहोचली आहे

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in