
अल्टीमेट फायटिंग चॅम्पियनशिप (Ultimate Fighting Championship) ची स्टार ज्युलियाना पेना (Julianna Pena) हिने कोरोना व्हायरसबाबत नवा दावा केला आहे. ज्यामुळे ती खूपच चर्चेत आहे. Julianna Pena म्हणते की, कोरोना हा फक्त पैसा लुटण्याचा एक मार्ग आहे, तसेच हा फक्त आपल्याला मारण्याचा एक कट आहे. एका मुलाखतीत Julianna Pena म्हणाली की, मी तुमच्याच शोमध्ये दोन डॉक्टरांना बोलताना ऐकले, त्यानंतर माझे डोळे उघडले.
Julianna Pena म्हणाली की, मी सुरुवातीपासून म्हणत आहे की, कोरोना हा फक्त पैसे कमवण्याचा एक मार्ग आहे. ज्यासाठी आम्हाला मारले जात आहे. मी तोवर मास्क घालत नाही जोवर कोणी मला टोकत नाही. अन्यथा मी मास्क घालतच नाही. Julianna Pena पुढे म्हणाली की, जे मला मास्क घालायला सांगतात त्यांना मी सांगते की, ती गोष्ट (कोरोना) आता निघून गेली आहे.
Julianna Pena ही सध्या UFC महिला बॅंथम वेट चॅम्पियन आहे आणि UFC क्रमवारीत ती चौथ्या क्रमांकावर आहे.
Julianna Pena ही एक अमेरिकन मार्शल आर्ट आर्टिस्ट आहे. जी अल्टीमेट फायटर सीरिज जिंकणारी पहिली महिला बॉक्सर बनली होती. Julianna Pena ची सोशल मीडियावरही खूप लोकप्रियता आहे, तिचे जवळपास पाच लाख फॉलोअर्स आहेत.
क्रीडा क्षेत्राशी निगडित अनेक लोक कोरोनाबाबत सातत्याने वक्तव्य करत आहेत. या क्षेत्रातील काही जणांना आधी कोरोनाबाबत फारसं गांभीर्य नव्हतं. तर कोणी लस घेण्यासच नकार देत होतं. नंबर वन टेनिसपटू नोव्हाक जोकोविचनेही ही लस घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये देखील भाग घेऊ शकला नव्हता.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच अशाच पद्धतीने अमेरिकेतील एका व्यक्तीने कोरोना थोतांड आहे आणि आपण कधीही मास्क परिधान करणार नाही असं म्हणत आंदोलनच उभारलं होतं. पण त्याच तरुणाचा Covid-19 मुळेच मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. कॅलेब वॉलेस असं या व्यक्तीचं नाव होतं.
कॅलेबने कोरोना विषाणूचा संसर्ग हा जेव्हा आपल्या अत्युच्च शिखरावर (पीकवर) असताना टेक्सासमध्ये एक आंदोलन सुरु केलं होतं. त्याचा असा युक्तिवाद होता की, लोकांना जबरदस्ती मास्क घालण्यास भाग पाडले जात आहे आणि ते लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारं आहे. त्यांनी सेंट्रल टेक्सासमधील सर्व गटांचे नेतृत्व करत या चळवळीचं पुढारीपण स्वीकारलं होतं.
कॅलेब वॉलेसने सॅन एंजेलोमध्ये काही महिन्यांपूर्वी एक रॅली आयोजित केली होती. ज्यामध्ये त्याने लोकांनी मास्क घालू नये असं थेट आवाहन केलं होत. तसेचे अमेरिकेतील एकूणच परिस्थितीबाबत नाराजी देखील व्यक्त केली होती. यावेळी त्याने सर्व कोरोना प्रोटोकॉल रद्द करण्यात यावे अशी मागणी देखील केली होती. असं असताना आता त्याच कॅलेब वॉलेसचा कोरोनानेच मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.