Corona: महाराष्ट्रात सलग तीन दिवस ४ हजारांपेक्षा जास्त रूग्ण, २२५५ एकट्या मुंबईत

दिवसभरात राज्यात कोरोनामुळे तीन रूग्णांच्या मृत्यूंची नोंद
Corona: महाराष्ट्रात सलग तीन दिवस ४ हजारांपेक्षा जास्त रूग्ण, २२५५  एकट्या मुंबईत
Corona: More than 4,000 patients in Maharashtra for three days in a row, 2255 in Mumbaiप्रातिनिधिक फोटो

महाराष्ट्रात कोरोनाने चिंता वाढवली आहे. सलग तीन दिवस ४ हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळत आहेत. शुक्रवारीही राज्यात ४ हजार १६५ रूग्ण पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यातले २२५५ रूग्ण मुंबईत आहेत. मुंबईकरांसाठी ही चिंतेची बाब आहे.

2255 corona cases in mumbai
2255 corona cases in mumbai Photo- India Today

महाराष्ट्रात दिवसभरात ४ हजार १६५ पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात ३०४७ रूग्ण बरे होऊन घरी परतलेत. सर्वाधिक २२५५ रूग्णांची नोंद मुंबईत झाली आहे. राज्यात दिवसभरात तीन मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत एकूण ७७ लाख ५८ हजार २३० रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोना रूग्ण बरे व्हायचं प्रमाण ९७.८६ टक्के झालं आहे. राज्याचा मृत्यू दर १.८६ टक्के झाला आहे.

Corona: More than 4,000 patients in Maharashtra for three days in a row, 2255 in Mumbai
कोरोना महामारीत आम्ही उत्पन्नांवर पाणी सोडलं, मुंबईतल्या खासगी हॉस्पिटल्सचं म्हणणं चर्चेत

राज्यातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्याही वाढली आहे. राज्यात आज घडीला एकूण २१ हजार ७४९ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. मुंबईतल्या सक्रिय रूग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजे १३ हजार ३०४ इतकी झाली आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये ४ हजार ४४२ सक्रिय रुग्ण आहेत.

देशातही कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. १२ हजार ८४७ नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर १४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातल्या कोरोना रूग्णांमध्ये वाढ होते आहे. कोरोनाचा वाढलेला धोका लक्षात घेता चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येते आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत खूप सक्रिय रूग्ण आढळले, तर दुसऱ्या लाटेत मृत्यूंचं प्रमाण वाढलेलं होतं. तर तिसऱ्या लाटेतही मृत्यू झाले होते. आता कोरोना रूग्ण वाढत आहेत पण रूग्णालयात रूग्ण दाखल करण्याचं प्रमाण नगण्य झालं आहे. अशातच आता चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

कोरोनाचा वाढता धोका पाहता कोरोनाच्या संभाव्य चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकीकडे सरकारकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. तर दुसरीकडे जगभरात पसरलेल्या मंकीपॉक्स व्हायरसच्या धोक्यामुळेही आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. देशात गुरुवारी दिवसभरात १४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ७ हजार ९८५ रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in