Covid 19 : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक! दिवसभरात 8067 नवे रूग्ण, 8 मृत्यूंची नोंद

Covid 19 : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक! दिवसभरात 8067 नवे रूग्ण, 8 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.11 टक्के इतका झाला आहे

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक काही थांबायचं नाव घेत नाहीये हेच रूग्णसंख्या सांगते आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 8067 रूग्ण दिवसभरात आढळले आहेत. तर आठ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.11 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 1766 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 65 लाख 9 हजार 96 कोरोना बाधित रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 90 लाख 10 हजार 153 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 78 हजार 821 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 75 हजार 592 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 1079 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्रात दिवसभरात 4 ओमिक्रॉन व्हेरिएंट रूग्णांची नोंद झाली आहे. या सगळ्या रूग्णांचे अहवाल एनआयव्हीने दिले आहेत. वसई-विरार, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पनवेल या ठिकाणी प्रत्येकी एक रूग्ण ओमिक्रॉन बाधित आढळला आहे.

Covid 19 : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक! दिवसभरात 8067 नवे रूग्ण, 8 मृत्यूंची नोंद
गर्दी नको, बेफिकीरीतून वाढलेला कोरोना संसर्गही नको! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन

महाराष्ट्रातील ओमिक्रॉन रूग्णांची संख्या आता 454 झाली आहे. त्यापैकी 327 रूग्ण हे एकट्या मुंबईत नोंदवले गेले आहेत.

महाराष्ट्रातले 454 रूग्ण कुठे कुठे आहेत?

मुंबई-327

पिंपरी-26

पुणे ग्रामीण-18

पुणे मनपा आणि ठाणे मनपा-प्रत्येकी 12

नवी मुंबई, पनवेल- प्रत्येकी 8

कल्याण डोंबिवली-7

नागपूर, सातारा-प्रत्येकी 6

उस्मानाबाद-5

वसई-विरार-4

नांदेड-3

औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी, मीरा भाईंदर-प्रत्येकी 2

लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर-प्रत्येकी 1

एकूण-454

कोरोना रुग्णसंख्या
कोरोना रुग्णसंख्या (फाइल फोटो, सौजन्य - PTI)

यातील 26 रूग्ण हे इतर राज्यातील आहेत तर प्रत्येकी एक रूग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड, आणि औरंगाबाद येथील आहे. सात रूग्ण ठाणे आणि चार रूग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. 9 रूग्ण हे विदेशी नागरिक आहेत. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वेक्षणात हे रूग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्रात आज घडीला 24,509 सक्रिय रूग्ण आहेत. महाराष्ट्रातल्या वाढत्या कोरोना रूग्णसंख्येने महाराष्ट्राचं टेन्शन वाढवलं आहे.

Covid 19 : महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक! दिवसभरात 8067 नवे रूग्ण, 8 मृत्यूंची नोंद
Omicron: देशातल्या 23 राज्यांमध्ये पसरला ओमिक्रॉन, सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काय आवाहन केलं आहे?

थांबायचं नाही. पण सतर्क आणि सावध राहायला हवं. कितीही आव्हानं येऊ देत. त्यावर आपण मात करूया. नव्या वर्षात हिच हिंमत बांधूया. आरोग्यदायी, समृद्ध महाराष्ट्र आणि बलशाली भारत घडवण्यासाठी एकजूट होऊया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्ष आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो. त्यासाठी आरोग्यदायी संकल्प करूया, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

नववर्षाचे स्वागत करताना जगावर आलेल्या कोरोना संकटाचे भान राखावे. गर्दी नकोच आणि आपल्या वागण्यातून, बेफिकिरीतून संसर्ग वाढीला हातभार लागणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी नव वर्ष प्रारंभाच्या पुर्वसंध्येला केले आहे

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in