अहमदनगर: जिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर बंद पडल्याने 2 कोरोना रूग्णाचा मृत्यू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अहमदनगर जिल्हा रूग्णालयात रूग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर बंद पडल्याने दोन कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक सहामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या वॉर्डात 13 क्रमांकाच्या बेडवर असलेल्या रूग्णाबाबत ही घटना घडली आहे. आज दुपारी साडेतीन दरम्यान पंधरा मिनिटं ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने दोन रूग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रूग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप रूग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे.

उस्मानाबादमध्ये कोव्हिड रूग्णांचे हाल, बेड मिळत नसल्याने खुर्चीवर बसवून ऑक्सिजन पुरवठा

ऑक्सिजन सिलिंडर बंद पडल्यानंतर 15 मिनिटात सिलिंडर बदलण्यात आलं. मात्र या पुढील काळात दोन्ही रूग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांचा त्यातच मृत्यू झाला. याबाबत आता प्रशासन काही कारवाई करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रूग्णाच्या नातेवाईकाने काय म्हटलं आहे?

‘आज दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान ऑक्सिजनचा पुरवठा खंडीत झाला. तिथल्या ऑन ड्युटी स्टाफने त्याकडे सुमारे 15 मिनटं दुर्लक्ष केलं. तसंच इथल्या शासकीय रूग्णालयात ऑक्सिमीटरही नाही. इथे कोरोना रूग्णासोबत कोणताही त्रास नसलेल्या नातेवाईकाला रूग्णासोबत थांबवलं जातं आहे.’

ADVERTISEMENT

‘मलाही माझ्या आजोबांसोबत दोन दिवसांपासून थांबवलं गेलं होतं. मी जेव्हा ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याचं सांगायला गेलो तेव्हा इथले कर्मचारी चहा प्यायला बाहेर गेले होते. 15 मिनिटं ऑक्सिजन न मिळाल्याने माझ्या आजोबांचा मृत्यू झाला आहे. आम्ही कारवाई करू असं जेव्हा रूग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी घाईने सिलिंडर आणले. माझ्या आजोबांचा मृत्यू झाला त्याला जबाबदार कोण?’ असाही प्रश्न रूग्णाच्या नातवाने विचारला आहे. तसंच आता मलाही कोरोनासारखा त्रास जाणवू लागला आहे. असंही या नातवाने सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

औरंगाबादची आरोग्यव्यवस्था व्हेंटीलेटरवर, ऑक्सिजन बेड्सची कमतरता

अहमदनगरमध्ये शनिवारीही एक धक्कादायक घटना समोर आली होती.. अहमदनगमध्ये शुक्रवारी रात्री 49 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ज्यापैकी 29 मृतदेहांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. अहमदनगरच्या स्मशानात असलेल्या विद्युत दाहिनीत 20 मृतदेहांवरच अंत्यसंस्कार करण्यात येतात. इतर मृतदेहांवर सरण रचून अंत्यसंस्कार करण्यात येतात. शुक्रवारी रात्री उशिरा 29 मृतदेहांवर एकाचवेळी सरण रचून अंत्यसंस्कार करण्यात आले. मन हेलावून टाकणारी ही घटना ठरली. अशात आता ऑक्सिजन सिलिंडरमधून ऑक्सिजनचा पुरवढा बंद झाल्याने एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT