
मुंबईत कोरोनाने चिंता वाढवली आहे कारण दिवसभरात कोरोनाच्या ७३९ रूग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सध्याच्या घडीला २९७० सक्रिय रूग्ण आहेत. तर मुंबईचा डबलिंग रेट २०२७ दिवस इतका आहे. २५ ते ३१ मे या कालावधीतला ग्रोथ रेट ०.०३३ टक्के इतका आहे. मुंबईत आत्तापर्यंत १० लाख ४४ हजार ५ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मुंबईत आज एकाही कोरोना मृत्यूची नोंद झालेली नाही.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून रूग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. मुंबईत ३१ मे रोजी ५०६ रूग्ण आढळले होते. ३० मे रोजी ३१८ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले होते. आज ही संख्या ७०० च्या पुढे गेली आहे.
राज्यात पहिल्यांदाच बीए ४ आणि ५ व्हेरिअंट
राज्यात २८ मे रोजी कोरोनाच्या बी. ए. व्हेरिएंटचे सर्व रूग्ण आढळले. हे सर्व रूग्ण पुणे शहरातील आहेत. यामध्ये चार पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे. या सर्व रूग्णांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत.
यात एका नऊ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. त्याने लस घेतलेली नाही. सर्व रूग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. सर्व रूग्णांना आता घरगुती विलिगीकरणात ठेवलं गेलं आहे.
राज्यात २२ मे ते २७ मे कसे वाढले रूग्ण?
२२ मे-३२६ नवे रूग्ण
२३ मे-२०८ नवे रूग्ण
२४ मे-३३८ नवे रूग्ण
२५ मे-३३४ नवे रूग्ण
२६ मे-५५१ नवे रूग्ण
२७ मे-५३६ नवे रूग्ण