Corona ने पुन्हा काढलं डोकं वर, महाराष्ट्रात फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच रूग्णसंख्या १ हजारांहून जास्त

महाराष्ट्रात दिवसभरात ५०० हून अधिक रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
Corona re-emerges for the first time since February, Maharashtra has over 1000 patients
Corona re-emerges for the first time since February, Maharashtra has over 1000 patients (प्रातिनिधिक फोटो)

राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे असंच दिसतं आहे. आज दिवसभरात राज्यात १ हजार ८१ नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. दैनंदिन कोरोना रूग्णसंख्येने पुन्हा एकदा १ हजार ही संख्या ओलांडली आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर थेट आज पहिल्यांदाच एवढी मोठी रूग्ण वाढ दिसून आली आहे. याआधी राज्यात २७ फेब्रुवारी ७८२ कोरोना रूग्ण आढळले होते.

कोरोना
कोरोना Photo- India Today

मुंबईतल्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या सातशेच्या पुढे गेली आहे तर राज्यात ही संख्या एक हजारांच्याही पुढे गेली आहे. त्यामुळे नक्कीच चिंता वाढली आहे. राज्यात दिवसभरात ५२४ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात ७७ लाख ३६ हजार २७५ कोरोना रूग्ण बरे झाले आहेत. तसंच मुंबई प्रमाणेच राज्यातही दिवसभरात एकाही कोरोना मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्याचा मृत्यू दर १.८७ टक्के इतका आहे.

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८ कोटी ९ लाख ५१ हजार ३६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ८८ हजार १६७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज घडीला ४ हजार ३२ रूग्ण सक्रिय आहेत. तर राज्यात दिवसभरात १०८१ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.

(फाइल फोटो, सौजन्य - PTI)

राज्यात २८ मे रोजी कोरोनाच्या बी. ए. व्हेरिएंटचे सर्व रूग्ण आढळले. हे सर्व रूग्ण पुणे शहरातील आहेत. यामध्ये चार पुरूष आणि तीन महिलांचा समावेश आहे. या सर्व रूग्णांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत.यात एका नऊ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. त्याने लस घेतलेली नाही. सर्व रूग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. सर्व रूग्णांना आता घरगुती विलिगीकरणात ठेवलं गेलं आहे.

राज्यात २२ मे ते २७ मे कसे वाढले रूग्ण?

२२ मे-३२६ नवे रूग्ण

२३ मे-२०८ नवे रूग्ण

२४ मे-३३८ नवे रूग्ण

२५ मे-३३४ नवे रूग्ण

२६ मे-५५१ नवे रूग्ण

२७ मे-५३६ नवे रूग्ण

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in