Corona पुन्हा येतोय? २७ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांत आठवडाभरात वाढली इतकी रूग्णसंख्या

कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत त्यामुळे देशात कोरोना परत येणार का? या चर्चा रंगल्या आहेत
corona virus in india covid cases deaths delhi maharashtra corona fourth wave weekly data
corona virus in india covid cases deaths delhi maharashtra corona fourth wave weekly data

Corona virus in India : देशात कोरोना पुन्हा येतोय का? असाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे मागच्या सात दिवसात समोर आलेली रूग्णसंख्या. मागच्या सात दिवसात देशातल्या विविध राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढल्याचं पाहण्यास मिळतं आहे. या आठवड्यात देशभरातल्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १ लाख २५ हजारांहून जास्त झाली आहे. तर ३०० च्या आसपास रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

corona virus in india covid cases deaths delhi maharashtra corona fourth wave weekly data
Corona ने पुन्हा काढलं डोकं वर, महाराष्ट्रात फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच रूग्णसंख्या १ हजारांहून जास्त

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मागच्या २४ तासात १६ हजार ९३५ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर ५१ रूग्णांचा कोरोनामुळे देशभरात मृत्यू झाला आहे. चिंतेची बाब हीदेखील आहे की संसर्गाचं प्रमाण हे १६१ दिवसांनी ६ टक्के झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या इशाऱ्यानुसार पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या पुढे गेला तर संसर्ग वाढण्याची चिन्हं असतात.

मागच्या काही दिवसांपासून बऱ्या होणाऱ्या कोरोना रूग्णांपेक्षा सक्रिय रूग्णांची संख्या वाढली आहे. देशात आता १ लाख ४४ हजार सक्रिय रूग्ण आहेत. तर मागच्या चोवीस तासात ८१५ कोरोनाचे सक्रिय रूग्ण देशभरात वाढले आहेत.

११ ते १७ जुलै या आठवडा भराच्या कालावधीत देशात १ लाख २५ हजारांहून जास्त कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर ३०० हून अधिक रूग्णांचा मृत्यू झाला. त्याआधीच्या आठवड्यात म्हणजेच ४ ते ११ जुलैच्या दरम्यान १ लाख २० हजार रूग्ण पॉझिटिव्ह आले होते आणि २३१ रूग्णांचा मृत्यू झाला.

कसे वाढत गेले आहेत देशात कोरोना रूग्ण?

कालावधी रूग्ण मृत्यू

३० मे ते ५ जून २५ हजार ५८६ ९०

६ ते १२जून ४८ हजार ७६६ ७०

१३ ते १९ जून ७९ हजार ७६६ १०२

२० ते २६ जून ९७ हजार ५७३ १४७

२७ जून ते ३ जुलै १ लाख११ हजार ५१८ २०३

४ ते १० जुलै १ लाख २० हजार ७६५ २३१

११ ते १७ जुलै १ लाख २८ हजार २०५ ३०६

देशातल्या २७ राज्यांमध्ये रूग्णसंख्या वाढली आहे. यामध्ये दिल्ली, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल ही राज्यं आहेत. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये मागच्या २४ तासात २६५९, केरळमध्ये २६०४, तामिळनाडूत २३१६, महाराष्ट्रात २१८६ तर कर्नाटकमध्ये ९४४ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत.

कोरोनाचा संसर्ग का वाढला आहे?

कोरोना संसर्ग वाढण्याचं मुख्य कारण आहे ते म्हणजे ओमिक्रॉन तसंच त्याचे सब व्हेरिएंट. देशात ओमिक्रॉनचे BA.2, BA.2.38 आणि BA.5 यामुळे संसर्ग वाढतो आहे.

BA.4 आणि BA.5 हे जास्त संसर्ग पसरवणारे सब व्हेरिएंट आहेत. देशात या संदर्भातली प्रकरणं कमी प्रमाणात समोर आली आहेत असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या ८० ते ८५ टक्के रूग्णांमध्ये BA.2 आणि BA.2.38 चे आहेत.

राजधानी दिल्लीत BA.4 तसंच BA.5 यांची प्रकरणं जास्त आहेत. मात्र आरोग्य तज्ज्ञांनी हे म्हटलंय की सब व्हेरिेएंटला घाबरण्याचं फारसं कारण नाही असंही सांगण्यात येतं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in