Corona : मुंबईत कोरोनाचा पुन्हा उद्रेक; एका दिवसात आढळले 5,631 रूग्ण

मुंबईचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर
Corona : मुंबईत कोरोनाचा पुन्हा उद्रेक; एका दिवसात आढळले 5,631 रूग्ण
कोव्हिड प्रातिनिधिक फोटो

मुंबईत दिवसभरात कोरोनाचं थैमान सुरूच असल्याचं चित्र आहे. दिवसभरात 5631 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 548 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत दिवसभरात 1 कोरोना मृत्यू नोंदवला गेला आहे. दिवसभरात मुंबईत 47 हजार 472 चाचण्या करण्यात आल्या. त्यातले 5631 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोना रूग्णसंख्या
कोरोना रूग्णसंख्या प्रातिनिधिक फोटो

मुंबईचा रूग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट हा 95 टक्के आहे. तर 24 ते 30 डिसेंबर या आठवड्यातील रूग्ण वाढीचा दर 0.20 टक्के आहे. मुंबईचा डबलिंग रेट 360 दिवसांवर गेला आहे. मुंबईतल्या सील केलेल्या इमारतींची संख्या आता 128 झाली आहे. तर मुंबईत झोपडपट्टी आणि चाळींच्या भागात एकूण 11 कंटेन्मेंट झोन सक्रिय आहेत. मुंबईत तिसरी लाट आली आहे अशीच चर्चा आता तज्ज्ञ करत असून लवकरच मुंबईत कठोर निर्बंध लागण्याची चिन्हं आहेत.

महाराष्ट्रात 8 हजाराहून जास्त कोरोना रूग्ण

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक काही थांबायचं नाव घेत नाहीये हेच रूग्णसंख्या सांगते आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 8067 रूग्ण दिवसभरात आढळले आहेत. तर आठ मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.11 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 1766 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात एकूण 65 लाख 9 हजार 96 कोरोना बाधित रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

कोव्हिड
मोठी बातमी! 3 जानेवारीपासून 15 ते 18 या वयोगटातील मुलांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लस

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 90 लाख 10 हजार 153 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 78 हजार 821 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 75 हजार 592 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 1079 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्रात दिवसभरात 4 ओमिक्रॉन व्हेरिएंट रूग्णांची नोंद झाली आहे. या सगळ्या रूग्णांचे अहवाल एनआयव्हीने दिले आहेत. वसई-विरार, नवी मुंबई, मीरा भाईंदर आणि पनवेल या ठिकाणी प्रत्येकी एक रूग्ण ओमिक्रॉन बाधित आढळला आहे.

महाराष्ट्रातील ओमिक्रॉन रूग्णांची संख्या आता 454 झाली आहे. त्यापैकी 327 रूग्ण हे एकट्या मुंबईत नोंदवले गेले आहेत.

महाराष्ट्रातले 454 रूग्ण कुठे कुठे आहेत?

मुंबई-327

पिंपरी-26

पुणे ग्रामीण-18

पुणे मनपा आणि ठाणे मनपा-प्रत्येकी 12

नवी मुंबई, पनवेल- प्रत्येकी 8

कल्याण डोंबिवली-7

नागपूर, सातारा-प्रत्येकी 6

उस्मानाबाद-5

वसई-विरार-4

नांदेड-3

औरंगाबाद, बुलढाणा, भिवंडी, मीरा भाईंदर-प्रत्येकी 2

लातूर, अहमदनगर, अकोला, कोल्हापूर-प्रत्येकी 1

एकूण-454

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in