Corona: रुग्णांमध्ये वाढ... लहान मुलांना धोका... चौथी लाट सुरू झाली?

राजधानी दिल्लीत कोरोनाचे रुग्ण हे पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. त्यामुळे कोरोनाची चौथी लाट तर सुरु झाली नाही ना? अशी भीती आता व्यक्त केली जात आहे.
Corona: रुग्णांमध्ये वाढ... लहान मुलांना धोका... चौथी लाट सुरू झाली?
coronavirus covid cases increase fourth wave positivity rate restrictions mask delhi maharashtra(प्रातिनिधिक फोटो)

Coronavirus: राजधानी दिल्लीत कोरोनाचा वेग पुन्हा एकदा वाढला असून आता यामुळे सगळीकडेच घबराट पसरली आहे. रविवारी दिल्लीत कोरोनाचे 517 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर संसर्ग दर 4.21% वर पोहोचला आहे. राजधानीत ज्या वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यामुळे चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, नव्या लाटेबाबत काहीही बोलणे आता तरी घाईचे ठरेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

सरकारचे म्हणणे आहे की, आता लागलीच घाबरण्याचे कारण नाही, कारण रूग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या खूपच कमी आहे. परंतु होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारपर्यंत दिल्लीत 772 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये होते, ज्यांची संख्या रविवारी 964 झाली. त्याच वेळी, 1 एप्रिल रोजी, होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या संक्रमित लोकांची संख्या 332 होती.

दिल्लीत कोरोना किती वेगाने वाढत आहे हे दिल्ली सरकारच्या आकडेवारीवरून समजू शकते. गुरुवारी दिल्लीत कोरोनाचे 325 रुग्ण आढळून आले आहेत आणि पॉझिटिव्ह दर 2.39% होता. शुक्रवारी, 3.95% पॉझिटिव्हीटी दरासह 366 रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी, पॉझिटिव्हीटी दर 5.33% पर्यंत खाली आला आणि रुग्णांची संख्या 461 वर पोहोचली. रविवारी संसर्गाचे प्रमाण निश्चितपणे कमी झाले, परंतु नवीन संक्रमितांची संख्या 50 हून अधिक वाढली.

रविवारी 12,270 कोव्हिड चाचण्या झाल्या, तर शनिवारी 8,646 चाचण्या झाल्या. इतक्या कमी चाचण्यांमध्येही संसर्गाचे प्रमाण ५ टक्क्यांच्या जवळपास पोहोचणे ही चिंता वाढवणारी बाब आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, 5 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हीटी दर हा 'चिंताजनक' आहे.

लहान मुलांसाठी धोक्याची घंटा...!

दिल्ली आणि लगतच्या एनसीआर भागात अनेक शाळांमध्ये मुलांना संसर्ग झाल्याचं समोर येऊ लागलं आहे. शाळांमध्ये मुलांना संसर्ग झाल्याचे आढळल्यावर दिल्ली सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. गौतम बुद्ध नगर आणि गाझियाबादमध्येही अनेक शाळांमध्ये मुलांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. मात्र, सध्या काळजी करण्यासारखे काही नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, घाबरण्याचे काही कारण नाही. मागील कोरोना लाटांच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की जरी मुलांना संसर्ग झाला तरी त्यांच्यात अतिशय सौम्य लक्षणे असतात आणि त्यांच्यावर लवकर उपचार केले जातात.

मात्र, आता शाळा सुरू झाल्यामुळे मुलांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्यांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे साथरोगतज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया यांचे म्हणणे आहे. मात्र, शाळा सुरू होण्यापूर्वीच 70 ते 90 टक्के मुलांना याची लागण झाल्याचे सेरो सर्वेक्षणाच्या आकडेवारीतून समोर आले होते, असेही ते सांगतात.

त्याच वेळी, ICMR एडीजी समीरन पांडा म्हणाले की, जगभरातून जे पुरावे समोर आले आहेत त्यावरून असे दिसून येते की, कोरोना पसरवण्यासाठी शाळा जबाबदार नाही. त्यांनी मास्क वापरण्याविषयी आणि कोव्हिडचे पालन करण्याबद्दल आधीच सांगितलं आहे.

आता पुन्हा कोरोना रुग्ण का वाढत आहेत?

ओमिक्रॉनमुळे तिसरी लाट जवळजवळ थांबली होती, परंतु आता पुन्हा एकदा संक्रमित लोकांची संख्या वाढू लागली आहे. रूग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत नसली तरी होम आयसोलेशनमध्ये राहणाऱ्या बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पण याचे नेमके कारण काय?

तिसऱ्या लाटेनंतर संसर्ग कमी झाल्यानंतर सर्व निर्बंध उठवण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. दिल्लीतही मास्क घालण्याची सक्ती रद्द करण्यात आली आहे. लोकांचा बेफिकीरपणाही वाढला होता. या सर्व कारणांमुळे संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, लोकांनी गर्दी जमवणे टाळावे आणि मास्क घालावे. दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, लक्षणे दर्शविणाऱ्या मोठ्या संख्येने लोकांची अद्याप चाचणी केली जात नाही. लक्षणे दिसू लागल्यावर तातडीने चाचणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

दिल्लीच्या सरकारी रुग्णालयातील आपत्कालीन विभागाच्या प्रमुख डॉ. रितू सक्सेना म्हणतात की लोकांनी गर्दी जमवणे टाळावे आणि मास्क घालावे तसेच सर्व कोव्हिड प्रोटोकॉलचे पालन करावे.

कोरोनावर नियंत्रण कसे मिळवणार?

दिल्लीच्या आरोग्य मंत्रालयाने 2 एप्रिल रोजी मास्क अनिवार्य नसल्याचं स्पष्ट केलं होतं. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही, असा आदेश आरोग्य मंत्रालयाने जारी केला होता. यापूर्वी असे न केल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येत होता.

दिल्लीतील वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) ची 20 एप्रिल रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा होणार आहे. या बैठकीत या आदेशावरही चर्चा होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. असे मानले जाते की संसर्ग वाढल्यानंतर, मास्क पुन्हा अनिवार्य केला जाऊ शकतो.

अपोलो रुग्णालयातील अंतर्गत औषध विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सुरनजीत चॅटर्जी यांचे मत आहे की, रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी असली, तरी संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांचा अवलंब केला पाहिजे.

डॉ. चटर्जी म्हणतात की, दिल्लीतील परिस्थिती पाहता डीडीएमएची बैठक थोडी आधी व्हायला हवी होती. ते म्हणतात की मास्कची आवश्यकता पुन्हा लागू करणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता योग्य ती पावले उचलावी लागतील.

coronavirus covid cases increase fourth wave  positivity rate restrictions mask delhi maharashtra
बापरे! कोरोना परतला, दिल्ली-मुंबईत रूग्णवाढ; XE व्हेरिएंटविषयी डॉक्टरांचा 'हा' इशारा

महाराष्ट्रात काय स्थिती काय?

दरम्यान, राजधानी दिल्लीत जरी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरीही महाराष्ट्रात मात्र, तशी कोणतीही स्थिती नसल्याचे सध्या दिसते आहे. काल दिवसभरात राज्यात फक्त 127 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 107 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 646 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Related Stories

No stories found.