Corona Update: तब्बल साडेसहा महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदा निचांकी रुग्णसंख्येची नोंद : उपचाराधीन रुग्णांची संख्याही घटली
Corona Update: तब्बल साडेसहा महिन्यांनंतर कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट
देशात तब्बल साडेसहा महिन्यांच्या कालावधीनंतर निचांकी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.(फोटो सौजन्य - PTI)

देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी अजूनही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. केरळात कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख उंचावला होता. दरम्यान, मंगळवारी मोठा दिलासा देणारी आकडेवारी समोर आली. देशात तब्बल साडेसहा महिन्यांच्या कालावधीनंतर निचांकी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.

गेल्या २४ तासांत देशात १८ हजार ७९५ रुग्ण नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. २७ सप्टेंबर रोजी आढळून आलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत २७.८ टक्क्यांनी रुग्णसंख्या घटली आहे. नवीन रुग्णसंख्येबरोबरच एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३,३६,९७,५८१ इतकी झाली आहे.

गेल्या २४ तासांत सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या राज्यांमध्ये केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये सोमवारी (२७ सप्टेंबर) ११ हजार ६९९ रुग्ण आढळून आले. त्यापाठोपाठ महाराष्ट्र २ हजार ४३२, मिझोराम १ हजार ८४६, तामिळनाडू १ हजार ६५७, आंध्र प्रदेश ६१८ आणि कर्नाटक ५०४ या राज्यांचा क्रमांक लागतो.

देशात तब्बल साडेसहा महिन्यांच्या कालावधीनंतर निचांकी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.
महाराष्ट्रात दुसऱ्यांदा Corona रूग्णसंख्येचा निचांक, दिवसभरात 2432 रूग्णांचे निदान

देशातील एकूण रुग्णांपैकी ८६.८६ टक्के रुग्ण या राज्यांतील आहेत. तर एकट्या केरळातील रुग्णांची संख्या ६२.२५ टक्के आहे. देशात गेल्या २४ तासांत १७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू केरळ (५८) आणि महाराष्ट्रात (३२) नोंदवले गेले आहेत. नवीन मृत्यूमुळे देशातील एकूण कोरोना मृतांचा आकडा ४ लाख ४७ हजार ३७३ इतका झाला आहे.

महाराष्ट्रातील स्थिती कशी?

महाराष्ट्रात सोमवारी (२७ सप्टेंबर) ३२ मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यू दर २.१२ टक्के इतका आहे, तर आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ८२ लाख ८६ हजार ३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख ४१ हजार ७६२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या २ लाख ५७ हजार १४४ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. १,५१७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

देशात तब्बल साडेसहा महिन्यांच्या कालावधीनंतर निचांकी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे.
मुंबई महापालिकेकडून महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम

मुंबईतील कोरोना परिस्थिती...

मुंबईतील कोरोना परिस्थिती आता पूर्वपदावर येऊ लागली आहे. मुंबईत सोमवारी (२७ सप्टेंबर) ३७७ रुग्ण आढळून आले. तर ३३४ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. सध्या मुंबईत ४ हजार ७०२ रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबईचा रुग्ण दुपटीचा दर ११८९ दिवस इतका असून, कोरोना संसर्ग प्रसाराचा दर ०.०६ टक्के इतका आहे.

Related Stories

No stories found.