Covid-19 Vaccine: खुशखबर! लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिनला मान्यता; मोफत मिळणार लस

covaxin allowed Kids between 2 to 18 years old: लहान मुलांचा कोरोनाच्या संसर्गापासून बचाव व्हावा यासाठी आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कारण 2 ते 18 वयाच्या मुलांना लस देण्यास परवानगी मिळाली आहे.
Covid-19 Vaccine: खुशखबर! लहान मुलांसाठी कोव्हॅक्सिनला मान्यता; मोफत मिळणार लस
covaxin vaccine allowed in Kids between 2 to 18 years old(फाइल फोटो)

नवी दिल्ली: कोव्हॅक्सिन (Covaxin) या कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आता 2 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. याला मंजुरी देखील देण्यात आली आहे. भारत बायोटेक आणि ICMR ने मिळून कोव्हॅक्सिनची निर्मिती केली आहे. ही भारतीय बनावटीची लस आहे. कोरोना विषाणूविरूद्ध क्लिनिकल चाचण्यांमध्ये Covaxin जवळजवळ 78 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

यासंदर्भात अशी माहिती मिळते आहे की, केंद्र सरकारकडून लवकरच याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील. त्यानंतरच मुलांच्या लसीकरणाला सुरूवात होणार आहे. दरम्यान, महत्त्वाची बाब म्हणजे मुलांना प्रौढांप्रमाणे Covaxin लसीचे दोन डोस दिले जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये लसीचा मुलांवर कोणताही दुष्परिणाम होत नसल्याचं समोर आलं आहे.

सूत्रांच्या मते, ज्या मुलांना दमा वगैरे समस्या आहेत त्यांचे लसीकरण हे आधी करण्यात येऊ शकते. ही लस सरकारी ठिकाणी मोफत दिली जाईल.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी दवाखान्यांमध्ये प्रोढ नागरिकांप्रमाणेच वय वर्षं 2 ते 18 वयोगटातील मुलांना ही लस मोफत दिली जाणार आहे.

संभाव्य तिसऱ्या लाटेआधी दिलासादायक बातमी

मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीला मंजुरी दिल्याने ही खूप दिलासा देणारी बाब ठरली आहे. कारण कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत मुलांना सर्वाधिक त्रास होईल असे म्हटले जात आहे. परंतु जर त्यापूर्वी मुलांना कोरोना प्रतिबंधक लस मिळू लागली तर संसर्ग कमी होण्याची शक्यता अधिक आहे.

covaxin vaccine allowed in Kids between 2 to 18 years old
Zydus Cadila vaccine: मोठी बातमी... 'या' महिन्यापासून मिळू शकते लहान मुलांना लस!

डॉक्टर नरेश त्रेहान यांच्या मते, प्रौढांप्रमाणेच मुलांचे देखील लसीकरण केले पाहिजे. याचा अर्थ असा की, त्यातही अशा मुलांना आधी कोरोना लस द्यावी ज्यांना संसर्ग होण्याची जास्त शक्यता आहे. त्रेहान असेही म्हणाले की, जर मुलांना कोरोनाची लस मिळाली तर शाळा पूर्णपणे उघडणे सोपे होईल, पालक आणि मुलांमधील कोरोनाची भीती देखील कमी होईल.

भारतात सध्या 18 वर्षावरील वयाच्या लोकांना कोरोना लस दिली जात आहे. यामध्ये कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक या कोरोना प्रतिबंधात्मक लस दिल्या जात आहेत. भारतात आतापर्यंत 95 कोटी कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in