Covid 19 : मुंबईत पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा दुप्पट रूग्णांना डिस्चार्ज, दिवसभरात 9 मृत्यूंची नोंद

Covid 19 : मुंबईत पॉझिटिव्ह रूग्णांपेक्षा दुप्पट रूग्णांना डिस्चार्ज, दिवसभरात 9 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात कोरोना रूग्ण चाचणी (फाइल फोटो)

मुंबईत दिवसभरात 11 हजार 317 रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 9 मृत्यूंची नोंद दिवसभरात झाली आहे. तर चांगली बातमी ही आहे की मुंबईत दिवसभरात जेवढे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले त्यापेक्षा दुप्पट रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज मुंबईत 22 हजार 73 रूग्णांना कोरोनातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आलं आहे.

आज दिवसभरात मुंबईत 11 हजार 317 रूग्ण आढळले आहेत. यापैकी 800 रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर 88 रूग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात मुंबईत 59 हजार 924 चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 11 हजार 317 पॉझिटिव्ह आल्या आहेत.

मुंबईचा रिकव्हरी रेट हा 89 टक्के झाला आहे. तर मुंबईत आत्तापर्यंत कोरोनाची बाधा होऊन 16 हजार 435 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आज घडीला 84 हजार 352 सक्रिय रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत एकूण 8 लाख 77 हजार 884 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत.

मुंबईचा डबलिंग रेट 39 दिवसांवर पोहचला आहे. मुंबईत आज जे 9 मृत्यू झाले त्यातले सहाजण पुरूष तर तीन महिला होत्या. या नऊपैकी दोन रूग्ण हे 40 वर्षे पेक्षा कमी वयाचे होते. तर एक रूग्ण 40 ते 60 या वयोगटामधला होता. इतर सहा रूग्ण 60 वर्षांवरील वयाचे होते. झोपडपट्टी आणि चाळी यामधल्या कटेन्मेंट झोनची संख्या शून्य झाली आहे. तर सील केलेल्या इमारतींची संख्या 65 आहे.

 कोरोना रुग्णसंख्या
कोरोना रुग्णसंख्याप्रातिनिधिक फोटो
महाराष्ट्रात कोरोना रूग्ण चाचणी
लहान मुलांसाठी डेल्टापेक्षा जास्त घातक ठरू शकतो ओमिक्रॉन, काय म्हणत आहेत तज्ज्ञ?

मुंबईत कसे वाढत गेले रूग्ण पाहा

24 डिसेंबर 683

25 डिसेंबर 757

26 डिसेंबर 922

27 डिसेंबर 809

28 डिसेंबर 1377

29 डिसेंबर 2510

30 डिसेंबर 3671

1 जानेवारी 6347

2 जानेवारी 8063

3 जानेवारी 8082

4 जानेवारी 10860

5 जानेवारी 15166

6 जानेवारी 20181

7 जानेवारी 20971

8 जानेवारी 20,318

9 जानेवारी 19474

10 जानेवारी 13,648

11 जानेवारी 11,647

12 जानेवारी 16,420

13 जानेवारी- 13, 702

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in