Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 1193 नवे रूग्ण, 39 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.6 टक्के झाला आहे
Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 1193 नवे रूग्ण, 39 मृत्यूंची नोंद
ADSC

महाराष्ट्रात दिवसभरात 1193 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर 39 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 1519 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 64 लाख 55 हजार 100 रूग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.6 टक्के झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 29 लाख 47 हजार 355 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 14 हजार 158 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 87 हजार 286 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 15 हजार 119 सक्रिय रूग्ण आहेत.

कोरोना रुग्ण संख्या
कोरोना रुग्ण संख्या (प्रातिनिधिक फोटो)

एक हजारांपेक्षा जास्त रूग्ण असलेले जिल्हे

मुंबई- 4186

ठाणे-1690

पुणे-3194

अहमदनगर-2087

महाराष्ट्रातल्या या चार जिल्ह्यांमध्ये एक हजारांपेक्षा जास्त सक्रिय रूग्ण आहेत. त्यातले सर्वाधिक सक्रिय रूग्ण मुंबईत त्यानंतर पुण्यात आहेत.

Covid 19 : महाराष्ट्रात दिवसभरात 1193 नवे रूग्ण, 39 मृत्यूंची नोंद
Wuhan Lab मध्येच Corona व्हायरस तयार केला, वटवाघूळ तर एक बहाणा आहे: संशोधन

डोंबिवलीत कलम 144

दिवाळीच्या दिवशी फडके रोड आणि नेहरू रोड तसेच डोंबिवली शहराच्या अन्य ठिकाणी एकत्रपणे गर्दी करू नका तसेच कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरुन सामाजिक अंतर राखून रोगाचा प्रादुर्भाव टाळा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच सीआरपीसी कलम 144 लागू असून जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. आदेशाचे उलंघन केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ऐन दिवाळीत डोंबिवलीमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही तरूणांना मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर न जमता दिवाळी साजरी करावी लागणार आहे.

कोरोनामुळे दोन वर्षात जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू

गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना नावाच्या हाहाकाराचा सामना करतं आहे. या महामारीने आत्तापर्यंत अनेक बळी घेतले. पहिली आणि दुसरी लाट या दोन्ही लाटा महाभयंकर म्हणाव्या अशाच होत्या. कोरोनाची दुसरी लाट आता कुठे ओसरू लागली आहे त्यात आता जगभरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येने चिंता वाढवली आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाची लागण होऊन जगभरात 50 लाखांहून जास्त मृत्यू झाले आहेत.

जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका हा सर्वाधिक होता. AP ने दिलेल्या वृत्तानुसार जगात जे कोरोना मृत्यू झाले त्यातील निम्मे मृत्यू हे अमेरिका, रशिया, ब्राझिल, मेक्सिको आणि भारतात झाले आहेत.

जॉन्स हाफकिन्स युनिव्हर्सिटीनुसार मृतांची संख्या लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्कोच्या एकत्रित लोकसंख्येएवढी आहे. पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ऑस्लोच्या अंदाजानुसार, 1950 पासून राष्ट्रांमधील लढाईत मारल्या गेलेल्या लोकांची ही संख्या आहे. जागतिक स्तरावर, कोरोना व्हायरस साथीचा रोग आता हृदयविकार आणि स्ट्रोक नंतर मृत्यूचे तिसरे प्रमुख कारण आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in