Covid 19 : महाराष्ट्रात 1426 नव्या रूग्णांचं निदान, 21 मृत्यूंची नोंद

राज्यातील मृत्यू दर 2.12 टक्के इतका आहे, गेल्या अनेक महिन्यांमध्ये तो कमी झालेला नाही
Covid 19 : महाराष्ट्रात 1426 नव्या रूग्णांचं निदान, 21 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्रात कोरोनाच्या रूग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. गेल्य काही दिवसांमध्ये रोज एक हजाराच्या वर रूग्ण आढळत आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 1426 नवे रूग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात राज्यात 21 कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के इतका आहे.

कोरोना रुग्ण संख्या
कोरोना रुग्ण संख्याप्रातिनिधिक फोटो

महाराष्ट्रात दिवसभरात 776 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत राज्यात 65 लाख 3 हजार 733 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 97.66 टक्के इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 85 लाख 49 हजार 133 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 66 लाख 59 हजार 314 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 91 हजार 464 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 880 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

आज घडीला राज्यात 10 हजार 441 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात कोरोनाच्या 1426 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या आता 66 लाख 59 हजार 314 इतकी झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं आहे. दिवसभरात राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे 26 रूग्ण आढळले आहेत. आज आढळलेल्या ओमिक्रॉनच्या 26 रूग्णांमुळे महाराष्ट्रात आत्तापर्यंत आढळलेल्या ओमिक्रॉन रूग्णांची संख्या 167 झाली आहे.

Covid 19 : महाराष्ट्रात 1426 नव्या रूग्णांचं निदान, 21 मृत्यूंची नोंद
मोठी बातमी! 3 जानेवारीपासून 15 ते 18 या वयोगटातील मुलांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लस

आज आढळलेल्या 26 ओमिक्रॉन व्हेरिएंट रूग्णांची माहिती

आज आढळलेल्या 26 ओमिक्रॉन रूग्णांपैकी 14 पुरूष आहेत तर 12 स्त्रिया आहेत. 26 पैकी 24 जणांचा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास आहे. तर दोन जण त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. 18 वर्षांखालील चारजण आहेत ज्यांचं लसीकरण पूर्ण झालेलं नाही. तर इतर तिघांचही लसीकरण झालेलं नाही. उर्वरित 19 जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. 24 पैकी 21 जणांना कोणतीही लक्षणं नाहीत तर उर्वरित पाचजणांना सौम्य लक्षणं आहेत.

राज्यात 1 नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत 743 प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 98 नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in