Covid19: महाराष्ट्रात 1573 नवीन रूग्णांचं निदान, 39 मृत्यूंची नोंद

Covid19: महाराष्ट्रात 1573 नवीन रूग्णांचं निदान, 39 मृत्यूंची नोंद
Maharashtra Corona Cases(फाइल फोटो)

महाराष्ट्रात 1573 नवीन रूग्णांचं निदान झालं आहे. तर 39 मृत्यूंची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रात 2968 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 64 लाख 30 हजार 394 रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.46 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 14 लाख 94 हजार 90 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 98 हजार 218 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 1 हजार 162 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 1007 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 24 हजार 292 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 1573 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 98 हजार 218 इतकी झाली आहे.

कोरोना रूग्णसंख्या
कोरोना रूग्णसंख्या प्रातिनिधिक फोटो

पुण्यात सलग दुसरा दिवस शून्य मृत्यूंचा

21 ऑक्टोबर

दिवसभरात 79 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

दिवसभरात 83 रुग्णांना डिस्चार्ज.

पुण्यात करोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००.

163 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुण्यात एकूण रूग्णसंख्या 503548

पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 984.

एकूण मृत्यू -9067.

आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 493497

आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5710

लॉकडाऊन झाल्यापासून म्हणजेच मागच्या दीड वर्षापासून शाळा आणि महाविद्यालयं बंद होती. ही शाळा महाविद्यालयं आता सुरू झाली आहेत. देशभरात लसीकरणाचं प्रमाण वाढलं आहे. 100 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडण्यात आला आहे. अशात आता नियम शिथीलही होत आहेत. त्या अनुषंगानेच विद्यार्थ्यांना मुंबई लोकल मधून प्रवास करता येणार आहे.

15 ऑगस्ट 2021 पासून कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलचा प्रवास करता येणार होता. आता महाविद्यालयं सुरू झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थीही लोकलने प्रवास करू शकणार आहेत.

शाळा आणि महाविद्यालयं बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू होतं. मात्र आता प्रत्यक्ष महाविद्यालयात जाता येणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान मुंबई लोकलमधून आता विद्यार्थ्यांना प्रवास करता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं वय 18 पेक्षा कमी आहे आणि त्यांना लस मिळालेली नाही अशा मुलांनाही मुंबई लोकलने प्रवास करता येणं आता शक्य होणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in