Covid 19: मुंबईत दिवसभरात 16 हजार 420 नव्या रूग्णांची नोंद, 7 मृत्यू

Covid 19: मुंबईत दिवसभरात 16 हजार 420 नव्या रूग्णांची नोंद, 7 मृत्यू
मुंबई Photo - India Today

मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 16 हजार 420 मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी 916 जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज दिवसभरात मुंबईत 14 हजार 649 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत आज दिवसभरात 7 मृत्यूंची नोंद झाली आहे. मुंबईत आत्तापर्यंत कोरोनामुळे एकूण 16 हजार 420 मृत्यू झाले आहेत. आज दिवसभरात 67 हजार 339 चाचण्या झाल्या त्यापैकी 16420 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.

आज ज्या सात मृत्यूंची नोंद मुंबईत झाली त्यापैकी पाच रूग्ण हे पुरूष होते तर दोन महिला होत्या. या सातही रूग्णांचं वय 60 वर्षे वयाच्या वरचं होतं. मुंबईचा डबलिंग रेट हा आता 36 दिवस झाला आहे तर मुंबईतील रूग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 87 टक्के झालं आहे. 5 ते 11 जानेवारी या कालावधीतला मुंबईतला ग्रोथ रेट 1.85 टक्के इतका नोंदवला गेला आहे.

मुंबई
मुंबई लोकल बंद होणार का? काय निर्बंध लागणार? राजेश टोपेंनी दिलं सविस्तर उत्तर, म्हणाले...

मुंबईतल्या अॅक्टिव्ह कटेंन्मेंट झोनची संख्या आता शून्य झाली आहे तर मुंबईत आज घडीला 56 इमारती सील करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

मुंबई
कोव्हिड संसर्ग झाला आहे पण लक्षणं दिसत नाहीत? सरकारने दिल्या 'या' मार्गदर्शक सूचना

मुंबईत कसे वाढत गेले रूग्ण पाहा

24 डिसेंबर 683

25 डिसेंबर 757

26 डिसेंबर 922

27 डिसेंबर 809

28 डिसेंबर 1377

29 डिसेंबर 2510

30 डिसेंबर 3671

1 जानेवारी 6347

2 जानेवारी 8063

3 जानेवारी 8082

4 जानेवारी 10860

5 जानेवारी 15166

6 जानेवारी 20181

7 जानेवारी 20971

8 जानेवारी 20,318

9 जानेवारी 19474

10 जानेवारी 13,648

11 जानेवारी 11,647

12 जानेवारी 16,420

कोरोना रूग्णसंख्या
कोरोना रूग्णसंख्या प्रातिनिधिक फोटो

मुंबईत मागच्या दोन आठवड्यात रूग्णसंख्या वाढते आहे. सातत्याने रूग्ण वाढत असले तरीही मुंबईत लॉकडाऊन लावण्यात आलेला नाही. तसंच राज्यातही लॉकडाऊन लावण्यात आलेला नाही. पॉझिटिव्ह येणाऱ्या रूग्णांची संख्या जास्त असली तरीही यामधले अनेक रूग्ण हे लक्षणं नसलेले आहेत. तसंच ओमिक्रॉन व्हेरिएंटचा प्रभाव हा डेल्टा इतका घातक नाही असंही सांगितलं जातं आहे. मात्र ऑक्सिजनचा वापर आणि बेड जास्त प्रमाणात भरले तर मुंबई आणि राज्याबाबत कठोर निर्णय घेतला जाईल असंही सांगण्यात आलं आहे. तूर्तास काही निर्बंध आहेत मात्र पूर्ण लॉकडाऊन लावण्यात आलेला नाही.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in