Covid 19: महाराष्ट्रात दिवसभरात 2069 नवीन रूग्णांचे निदान, 43 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.36 टक्के इतका झाला आहे
Covid 19: महाराष्ट्रात दिवसभरात 2069 नवीन रूग्णांचे निदान, 43 मृत्यूंची नोंद
महाराष्ट्रात कोरोना रूग्ण चाचणी (फाइल फोटो)

महाराष्ट्रात आज दिवसभरात 2069 नव्या रूग्णांचे निदान झालं आहे. तर 43 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. आज दिवसभरात 3616 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 64 लाख 7 हजार 936 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.36 टक्के इतका झाला आहे.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत 6 कोटी 4 लाख 20 हजार 515 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी एकूण 65 लाख 81 हजार 677 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्रात आज घडीला 2 लाख 31 हजार 99 लोक होम क्वारंटाईन आहेत तर 1131 लोक संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. तर राज्यात आज घडीला 30 हजार 525 सक्रिय रूग्ण आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

कोरोना चाचणी करताना डॉक्टर.
कोरोना चाचणी करताना डॉक्टर.मुंबई तक

लवकरच 2 ते 18 वयोगटासाठी लस

कोव्हॅक्सिन (Covaxin) या कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आता 2 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. याला मंजुरी देखील देण्यात आली आहे. भारत बायोटेक आणि ICMR ने मिळून कोव्हॅक्सिनची निर्मिती केली आहे. ही भारतीय बनावटीची लस आहे. कोरोना विषाणूविरूद्ध क्लिनिकल चाचण्यांमध्ये Covaxin जवळजवळ 78 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

यासंदर्भात अशी माहिती मिळते आहे की, केंद्र सरकारकडून लवकरच याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील. त्यानंतरच मुलांच्या लसीकरणाला सुरूवात होणार आहे. दरम्यान, महत्त्वाची बाब म्हणजे मुलांना प्रौढांप्रमाणे Covaxin लसीचे दोन डोस दिले जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये लसीचा मुलांवर कोणताही दुष्परिणाम होत नसल्याचं समोर आलं आहे.

महाराष्ट्रात कोरोना रूग्ण चाचणी
'मोदींचा फोटो नसलेलं लसीकरण प्रमाणपत्र हवंय'; उच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसरी लाट?

महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्येत घट दिसते आहे, दुसरी लाट ओसरत असतानाच आता राज्यात दसरा दिवाळीनंतर तिसरी लाट येऊ शकते असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला आहे. महाराष्ट्रात आजच म्हणजचे घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी मंदिरं सुरू करण्यात आली. याआधीही टप्प्याटप्प्याने अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. अशात राजेश टोपे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Related Stories

No stories found.