Covid 19: महाराष्ट्रात दिवसभरात 2219 रूग्णांचं निदान, 49 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.38 टक्के
Covid 19: महाराष्ट्रात दिवसभरात 2219 रूग्णांचं निदान, 49 मृत्यूंची नोंद
कोरोना रुग्णसंख्या

महाराष्ट्रात दिवसभरात 2219 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. तर दिवसभरात 49 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आज दिवसभरात राज्यात 3139 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात एकूण 64 लाख 11 हजार 75 रूग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.38 टक्के इतका झाला आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 5 लाख 46 हजार 572 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 83 हजार 896 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 32 हजार 261 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 1122 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज रोजी एकूण 29 हजार 555 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 2219 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यात कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 83 हजार 896 झाली आहे.

कोरोना
कोरोना Photo- India Today

लवकरच 2 ते 18 वयोगटासाठी लस

कोव्हॅक्सिन (Covaxin) या कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आता 2 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. याला मंजुरी देखील देण्यात आली आहे. भारत बायोटेक आणि ICMR ने मिळून कोव्हॅक्सिनची निर्मिती केली आहे. ही भारतीय बनावटीची लस आहे. कोरोना विषाणूविरूद्ध क्लिनिकल चाचण्यांमध्ये Covaxin जवळजवळ 78 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

यासंदर्भात अशी माहिती मिळते आहे की, केंद्र सरकारकडून लवकरच याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील. त्यानंतरच मुलांच्या लसीकरणाला सुरूवात होणार आहे. दरम्यान, महत्त्वाची बाब म्हणजे मुलांना प्रौढांप्रमाणे Covaxin लसीचे दोन डोस दिले जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये लसीचा मुलांवर कोणताही दुष्परिणाम होत नसल्याचं समोर आलं आहे.

दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसरी लाट?

महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्येत घट दिसते आहे, दुसरी लाट ओसरत असतानाच आता राज्यात दसरा दिवाळीनंतर तिसरी लाट येऊ शकते असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला आहे. महाराष्ट्रात आजच म्हणजचे घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी मंदिरं सुरू करण्यात आली. याआधीही टप्प्याटप्प्याने अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. अशात राजेश टोपे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Related Stories

No stories found.