Covid 19 : महाराष्ट्रात 2384 नवे कोरोना रूग्ण, 35 मृत्यूंची नोंद

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.38 टक्के इतका झाला आहे
Covid 19 : महाराष्ट्रात 2384 नवे कोरोना रूग्ण, 35 मृत्यूंची नोंद
ADSC

महाराष्ट्रात 2384 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. आज दिवसभरात 35 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. तर 2343 रूग्णांना दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत राज्यात एकूण 64 लाख 13 हजार 418 कोरोना रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.38 टक्के इतका झाला आहे.

महाराष्ट्रात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 6 लाख 83 हजार 524 चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी 65 लाख 86 हजार 280 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्याच्या घडीला 2 लाख 26 हजार 249 जण होम क्वारंटाईन आहेत. तर 1070 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला राज्यात 29560 सक्रिय रूग्ण आहेत.

 कोरोना रुग्णसंख्या
कोरोना रुग्णसंख्याप्रातिनिधिक फोटो

लवकरच 2 ते 18 वयोगटासाठी लस

कोव्हॅक्सिन (Covaxin) या कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. आता 2 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. याला मंजुरी देखील देण्यात आली आहे. भारत बायोटेक आणि ICMR ने मिळून कोव्हॅक्सिनची निर्मिती केली आहे. ही भारतीय बनावटीची लस आहे. कोरोना विषाणूविरूद्ध क्लिनिकल चाचण्यांमध्ये Covaxin जवळजवळ 78 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.

यासंदर्भात अशी माहिती मिळते आहे की, केंद्र सरकारकडून लवकरच याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील. त्यानंतरच मुलांच्या लसीकरणाला सुरूवात होणार आहे. दरम्यान, महत्त्वाची बाब म्हणजे मुलांना प्रौढांप्रमाणे Covaxin लसीचे दोन डोस दिले जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत घेण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये लसीचा मुलांवर कोणताही दुष्परिणाम होत नसल्याचं समोर आलं आहे.

कोरोना रुग्णसंख्या
कोरोना रुग्णसंख्याप्रातिनिधिक फोटो

दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसरी लाट?

महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्येत घट दिसते आहे, दुसरी लाट ओसरत असतानाच आता राज्यात दसरा दिवाळीनंतर तिसरी लाट येऊ शकते असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला आहे. महाराष्ट्रात आजच म्हणजचे घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी मंदिरं सुरू करण्यात आली. याआधीही टप्प्याटप्प्याने अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. अशात राजेश टोपे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Related Stories

No stories found.