Covid 19 : महाराष्ट्रात 2486 नव्या कोरोना रूग्णांचं निदान, 44 मृत्यू
कोरोना रूग्णसंख्या प्रातिनिधिक फोटो

Covid 19 : महाराष्ट्रात 2486 नव्या कोरोना रूग्णांचं निदान, 44 मृत्यू

महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 97.32 टक्के इतका झाला आहे

महाराष्ट्रात 2486 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज 44 मृत्यू झाले आहेत. सध्या राज्याचा मृत्यू दर 2.12 टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात दिवसभरात 2446 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 63 लाख 99 हजार 464 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 57 हजार 326 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 75 हजार 578 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात 2 लाख 41 हजार 499 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 1023 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्रात सध्या 33 हजार 6 सक्रिय रूग्ण आहेत. आज राज्यात 2486 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील एकूण रूग्णांची संख्या 65 लाख 75 हजार 578 झाली आहे.

कोरोना
कोरोना (फाइल फोटो, सौजन्य- PTI)
कोरोना रूग्णसंख्या
Covid 19: 'कोरोना व्हायरसला हरविण्यासाठी बूस्टर डोस आवश्यक'

दसरा, दिवाळीनंतर राज्यात तिसरी लाट?

महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्येत घट दिसते आहे, दुसरी लाट ओसरत असतानाच आता राज्यात दसरा दिवाळीनंतर तिसरी लाट येऊ शकते असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला आहे. महाराष्ट्रात आजच म्हणजचे घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी मंदिरं सुरू करण्यात आली. याआधीही टप्प्याटप्प्याने अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. अशात आज राजेश टोपे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात 7 ऑक्टोबरला जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मिशन कवच कुंडल या नवीन मोहिमेची घोषणाही केली. या मोहिमच्या अंतर्गत राज्यात 15 ऑक्टोबरपर्यंत वेगाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. राज्यात कुठेही लसींची कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली जाईल असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आङे. 8 ऑक्टोबर म्हणजेच शुक्रवारपासून राज्यात रोज 15 लाख लसीकरण करण्यात येणार आहे. आपल्याकडे सध्या एक कोटी लसी उपलब्ध आहेत अशीही माहिती राजेश टोपे यांनी दिली.

लसीकरणाबाबत काय म्हणाले काय म्हणाले राजेश टोपे?

आपण विशेष लसीकरण मोहीम राबवत आहोत. जेणेकरून आरोग्यावर गंभीर परिणाम होणार नाही. लसीकरण हाच आता मोठा पर्याय आहे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. मुस्लिम बांधवही मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून घेत आहेत मात्र मालेगावसारख्या ठिकाणी अद्यापही लसीकरण म्हणावं तसं झालेलं नाही. त्या ठिकाणी धर्मगुरू, मौलवी आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने लसीकरण केलं जाईल असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.